आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates : 61 Thousand 252 Patients Increased In One Day, 23.28 Lakh Cases In The Country

कोरोना देश LIVE:एका दिवसात 61 हजार 252 रुग्ण वाढले, देशात आतापर्यंत 23.28 लाख केस, मुंबईच्या धारावीने कोरोनावर केली मात, 10 दिवसात एकही मृत्यू नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीमधून गूड न्यूज आहे. अधिकाऱ्यांनी म्हटले की, 10 दिवसांमध्ये आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टीमध्ये एकाही संक्रमिताचा मृत्यू झालेला नाही.

मंगळवारी येथे 24 केस समोर आले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकड्यांनुसार, धारावीमध्ये आतापर्यंत 2634 केस समोर आल्या आहेत. येथे आता केवळ 81 अॅक्टिव्ह केस आहेत. 2295 रुग्ण बरे झाले. तर 258 लोकांचा मृत्यू झाला आहे.

तर देशात कोरोना रुग्णांची संख्या 23 लाख 28 हजार 405 झाली आहे. मंगळवारी 61 हजार 252 रुग्ण वाढले. तर 835 लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सकाळी आपले आकडे जारी केले. यानुसार गेल्या 24 तासांमध्ये 60 हजार 963 रुग्ण वाढले आणि 834 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील एकूण रुग्णांची संख्या वाढून 23 लाख 29 हजार 639 झाली आहे. यामध्ये 6 लाख 43 हजार 948 अॅक्टिव्ह केस आहेत. तर 16 लाख 30 हजार 600 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 46 हजार 91 लोकांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...