आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देश LIVE:देशात आता 20.27 लाख केस, गेल्या 24 तासांमध्ये 62 हजार 170 रुग्णांमध्ये वाढ, 7 दिवसात जगात सर्वात जास्त 3.97 रुग्ण भारतात वाढले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात गुरुवात 899 मृत्यू झाले, देशात आतापर्यंत 41 हजार 638 लोकांचा गेला जीव
  • महाराष्ट्रात गुरुवारी सर्वात जास्त 11 हजार 514 आणि आंध्र प्रदेशात 10 हजार 328 संक्रमित आढळले

देशात कोरोना संक्रमितांची संख्या 20 लाखांपार गेली आहे. शुक्रवारी सकाळी 20 लाख 27 हजार 746 केस समोर आले आहेत. गुरुवारी एका दिवसात 62 हजार 170 रुग्ण वाढले. हा एका दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे. तर महाराष्ट्रात गुरुवारी सर्वात जास्त 11 हजार 514 आणि आंध्र प्रदेशात 10 हजार 328 संक्रमित सापडले.

दरम्यान, जगात एक नवीन ट्रेंड समोर आला आहे. भारतात रुग्ण 2.4% च्या दराने वाढत आहेत. गेल्या 7 दिवसात (29 जुलै ते 7 ऑगस्ट) भारतात 3.79 लाख रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याच वेळी, अमेरिकेत 3.76 लाख आणि ब्राझीलमध्ये 3.07 लाख लोक संक्रमित झाले. नवीन रुग्णांच्या वाढीचा दर यूएस मध्ये 1% आणि ब्राझीलमध्ये 1.6% आहे. म्हणजेच या तिन्ही देशांपैकी रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाणही भारतात सर्वाधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...