आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:आरोग्य मंत्रालयानुसार - 'लसीकरणानंतर 28 लोकांना रुग्णालयात केले दाखल, यामधील 9 जणांचा मृत्यू, पण सर्वांची कारणे वेगवेगळी'

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी देशात 11 हजार 924 लोक कोरोना संक्रमित आढळले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात आतापर्यंत 56 लाख 36 हजारांपेक्षा जास्त फ्रंट लाइन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 28 लोकांना लसीकरणानंतर रुग्णालयात दाखल करावे लागले. मंत्रालयानुसार, या 28 लोकांमधून आतापर्यंत 19 लोकांना उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मंत्रालयाने म्हटले आहे की, या लोकांचा मृत्यू लसीमुळे झालेला नाही तर मृत्यूची कारणे ही वेगवेगळी आहेत.

13 राज्यामध्ये 60% पेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली लस
मंत्रालयाच्या माहितीनुसार, 13 राज्य आणि केंद्र शासित राज्य असे आहेत जेथे 60% पेक्षा जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त बिहारमध्ये 76.6% आणि मध्य प्रदेशात 76.1% व्हॅक्सीनेशनचे काम पूर्ण झाले आहेत. या व्यतिरिक्त त्रिपुरा, उत्तराखंड, मिझोराम, उत्तर प्रदेश, केरळ, ओडिशा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान निकोबार आणि छत्तीसगढमध्ये 60% आरोग्य कर्णचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. राजधानी दिल्ल, पंजाबसह 12 राज्यांमध्ये 40% पेक्षाही कमी लसीकरणाचे काम झाले आहे.

सलग दुसऱ्या दिवशी 100 पेक्षा कमी मृत्यू
देशात कोरोना रुग्णांसोबतच संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही घट होत आहे. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी 100 पेक्षा कमी लोकांनी जीव गमावला. शुक्रवारी देशात 95 रुग्णांचा मृत्यू झाला होता. शनिवारी हा आकडा कमी होऊन 71 झाला. यापूर्वी 1 फेब्रुवारीला 94 मृत्यू नोंदवण्यात आले. संक्रमणामुळे आतापर्यंत देशात 1 लाख 55 हजार 28 लोकांनी जीव गमावले आहेत.

शनिवारी 11,924 नवीन रुग्ण आढळले
शनिवारी देशात 11 हजार 924 लोक कोरोना संक्रमित आढळले. 11 हजार 596 लोक रिकव्हर झाले आणि 71 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 1 कोटी 8 लाख 27 हजार 170 लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. यामध्ये 1 कोटी 5 लाख 21 हजार 409 रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या 1 लाख 46 हजार 196 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.