आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:10 दिवसात 75 हजारांपेक्षा जास्त अॅक्टिव्ह केस झाल्या कमी, रोज 40 हजारांपेक्षा कमी केस आल्या समोर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 97.35 लाख केस आल्या आहेत.

देशात नोव्हेंबरमध्ये वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने कमी होत आहे. मंगळवारी 32 हजार 61 नवीन केस समोर आले. हा सलग 10 वा दिवस होता जेव्हा 40 हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळले आणि 36 हजार 538 रुग्ण बरे झाले. तर 402 संक्रमितांचा मृत्यू झाला. यासोबतच अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 4899 ने कमी झाली आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये 75 हजार 654 अॅक्टिव्ह केस कमी झाले आहेत.

देशात आतापर्यंत 97.35 लाख केस आल्या आहेत. 92.14 लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर 1.41 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण 3.77 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

तर महाराष्ट्रात मंगळवारी 4026 नवीन रुग्ण आढळले आहेत. 6365 लोक पुन्हा रिकव्हर झाले आहेत आणि 53 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 18 लाख 59 हजार 367 लोकांना संक्रमण झाले आहे. यामधील 73 हजार 374 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर 17 लाख 37 हजार 80 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या आता 47 हजार 827 झाली आहे.

कोरोना लसीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी 60 देशांचे मुत्सद्दी बुधवार 9 डिसेंबर रोजी हैदराबाद येथील भारत बायोटेक आणि बायोलॉजिकल ई लिमिटेडला भेट देतील. यापूर्वी हा दौरा 4 डिसेंबर रोजी होणार होता, परंतु नंतर पुढे ढकलण्यात आला.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser