आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:गेल्या 24 तासांमध्ये 8,689 नवीन रुग्ण आले समोर, या महिन्यात हा दुसरा सर्वात कमी आकडा; जवळपास 5 हजार पॉझिटिव्ह प्रकरणे झाले कमी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रात सोमवारी 2,216 नवीन रुग्ण आढळले.

देशात कोरोना रुग्णांच्या आकड्यांनी पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. सोमवारी 8,689 नवीन रुग्ण आढळले. तर 13,575 संक्रमित बरे झाले आणि 77 रुग्णांनी जीव गमावला. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांची संख्या 4,973 ने कमी झाली आहे. या महिन्यात नवीन रुग्णांच्या संख्येत हा दुसरा सर्वात कमी आकडा आहे. यापूर्वी 1 फेब्रुवारीला 8,579 नवीन रुग्ण आढळले होते.

देशात आतापर्यंत 1.08 कोटी लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 1.03 कोटी लोक बरे झाले आहेत. 1.55 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1.41 लाख लोकांनीवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

महाराष्ट्रात सोमवारी 2,216 नवीन रुग्ण आढळले.3,423 रुग्ण बरे झाले आणि 15 जणांनी जीव गमावला. आतापर्यंत 20.46 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 19.58 लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर 51,325 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 34,720 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...