आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशातील कोरोनाबाधितांची संख्या 8 लाख 44 हजार 777 झाली आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे. यादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, बंगळुरूच्या शहरी आणि ग्रामीण भागात 14 जुलै रात्री 8 वाजेपासून 22 जुलै सकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाउन राहील. यादरम्यान अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील.
नागालँडमध्ये देखील 31 जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. अगोदर 16 जुलै रोजी येथील लॉकडाउन संपणार होता. मात्र राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणखी 15 दिवसांसाठी वाढवला. दुसरीकडे युपीत पहिल्याच दिवशी लॉकडाउनचा फज्जा उडाला. लोक घराबाहेर फिरत होते. दरम्यान पोलिसांनी यांवर कारवाई केली.
मोदींनी घेतली आढावा बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील कोरोना व्हायरसच्या स्थितीचा आढावा घेतला. बैठकीत गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, कॅबिनेट सचिव आणि केंद्र सरकारचे अधिकारी उपस्थित होते. मोदी म्हणाले की, "एनसीआरमधील वाढती प्रकरणे रोखण्यासाठी असेच काम केले पाहिजे." दिल्लीत एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण झाले आहेत. मात्र येथील रिकव्हरी रेट जवळपास 77% आहे.
सर्वात जास्त महाराष्ट्रात 7862 आणि तामिळनाडूमध्ये 3680 रुग्ण वाढले. कर्नाटकात 2223 आणि देशाची राजधानी दिल्लीमध्ये 2090 नवीन रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त आंध्रप्रदेशात 1608, उत्तर प्रदेशात 1338, तेलंगानामध्ये 1278 आणि पश्चिम बंगालमध्ये 1198 रुग्ण सापडले.
तर उत्तर प्रदेशात शुक्रवारी रात्री 10 वाजेपासून 13 जुलैच्या सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन सुरू झाले आहे. यादरम्यान केवळ अत्यावश्यक साहित्याच्या दुकान सुरू राहणार आहेत.
कोरोना अपडेट्स
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.