आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates; BJP National President JP Nadda Is Corona Positive

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना संकट:भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना कोरोनाची लागण, तीन दिवसांपूर्वीच बंगालमध्ये रोड शो केला होता

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात 24 तासात 3 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. तीन दिवसांपूर्वीच ते बंगाल दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी 9 आणि 10 डिसेंबरला रोड शो आणि रॅली केली होती. नड्डांनी सोशल मीडियावरुन कोरोना संक्रमण झाल्याची माहिती दिली. तुर्तास त्यांचे पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

सोशल मीडियावर त्यांनी लिहीले, ''कोरोनाचे लक्षण दिसल्यानंतर मी चाचणी केली होती, त्यात पॉझिटिव्ह आलो आहे. सध्या माझी तब्येत ठीक आहे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनमध्ये आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली टेस्ट करुन घ्यावी.''

एका दिवसात 3 हजार अॅक्टिव केस कमी झाले

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस कपात होताना दिसत आहे. मागील 24 तासात 3 हजार 138 अॅक्टिव केस कमी झाले. देशात सध्या 3 लाख 54 हजार 904 अॅक्टिव केस आहेत. आतापर्यंत 98 लाख 57 हजार 380 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. 93 लाख 56 हजार 879 लोक ठीक झाले आहेत, तर 1 लाख 43 हजार 055 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser