आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

कोरोना देश LIVE:पहिल्यांदाच अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट, 24 तासांमध्ये 4753 रुग्ण झाले कमी, देशात आतापर्यंत 27.01 लाख प्रकरणं

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सोमवारी 880 रुग्यांचा मृत्यू, या आजारामुळे आतापर्यंत 51हजार 925 जणांचा मृत्यू
  • महाराष्ट्रात सोमवारी सर्वात जास्त 8493 केस आल्या, सर्वात जास्त 3127 रुग्ण येथेच झाले बरे

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 54 हजार 300 रुग्ण आढळले. 58 हजार 172 पेक्षा जास्त लोक बरे झाले ही दिलासादायक बाब आहे. दरम्यान 880 लोक मरण पावले. काल, 4753 सक्रिय प्रकरणे कमी झाली आहेत. यापूर्वी 29 मे रोजी 3866 सक्रिय प्रकरणे कमी झाले होते. देशात कोरोना साथीचा प्रादुर्भाव झाल्यापासून आतापर्यंत केवळ सहा वेळा सक्रिय प्रकरणांमध्ये घट झाली आहे. असे तेव्हाच होते जेव्हा एका दिवसात नव्याने संसर्ग होणाऱ्यांपेक्षा जास्त रुग्ण बरे होतात.

दुसरीकडे, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 27 लाख 1 हजार 604 झाली आहे. सोमवारी महाराष्ट्रात सर्वाधिक 8493 रुग्ण आढळले. तर सर्वाधिक 3127 रुग्ण बरे झाले. आंध्र प्रदेश 6780 प्रकरणांसह दुसर्‍या क्रमांकावर आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार 55 हजार 79 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याच वेळी, 876 लोक मरण पावले. अशाप्रकारे, देशातील संक्रमितांची एकूण संख्या 27 लाख 2 हजार 743 झाली आहे. यामध्ये 6 लाख 73 हजार 166 सक्रिय प्रकरणांचा समावेश आहे. 19 लाख 77 हजार 780 रुग्ण निरोगी झाले आहेत. त्याचबरोबर देशात आतापर्यंत 51 हजार 797 लोकांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...