आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates Novel Corona (COVID 19) Death Toll India 17 April Latest News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:कोरोना संक्रमितांनी पार केला 14 हजारांचा आकडा: केरळमध्ये आज फक्त एक रुग्ण सापडला, महाराष्ट्रात सापडले 34 नवीन रुग्ण

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
प्रयागराजमध्ये महिला पोलिस अधिकारी व्यक्तीला लॉकडाऊनचे पालन करण्यास सांगत आहे - Divya Marathi
प्रयागराजमध्ये महिला पोलिस अधिकारी व्यक्तीला लॉकडाऊनचे पालन करण्यास सांगत आहे
  • 12 एप्रिल रोजी देशात सर्वाधिक 1242 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता
  • मध्यप्रदेशातील इंदूर संक्रमणाचे केंद्र बनले, गुरुवारी विक्रमी 256 नवीन पॉझिटिव्ह मिळाले

देशातील कोरोना संक्रमितांची संख्या 14 हजार 192 झाली आहे. यात गुजरातमध्ये 92, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये 38-38, मध्यप्रदेश 36, महाराष्ट्र 34, पश्चिम बंगाल 24, अंडमान-निकोबार आणि केरळ 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळला.

गुरुवारी संक्रमितांचे सर्वाधिक 1 हजार 59 नवीन प्रकरणे समोर आली. एका दिवसात संक्रमित होण्याची ही दुसरी सर्वात मोठी संख्या आहे. याआधी 13 एप्रिल रोजी सर्वाधिक 1 हजार 242 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. शुक्रवारी 82 नवीन प्रकरणे समोर आली होती. यातील 38 रुग्ण राजस्थान आणि 24 पश्चिम बंगालमध्ये आढळले होते. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आहे. आरोग् आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत 13 हजार 387 कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत. यातील 11 हजार 201 रुग्णांवर उपचार सुरू आहे तर 1 हजार 748 रुग्ण बरे झाले आहेत. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 468 मृत्यू झाले आहेत. 

मध्यप्रदेशात इंदूर बनले केंद्र 

गुरुवारी महाराष्ट्रात 286, राजस्थानात 55, उत्तरप्रदेशात 70, गुजरातमध्ये 163 आणि बिहारमध्ये 8 नवीन रुग्ण मिळाले. दुसरीकडे मध्यप्रदेशातील इंदूमध्ये विक्रमी 265 नवीन रुग्ण मिळाले. एका दिवसात देशातील कोणत्याही शहरात ही सर्वाधिक प्रकरणे आढळली आहेत. मध्यप्रदेशातील 65% रुग्ण इंदूरमध्येच आहेत. 

बातम्या आणखी आहेत...