आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोना संक्रमितांची संख्या 4 हजार 76 झाली आहे. तर, 10 हजार 941 म्हणजेच 27% रुग्ण ठीक झाले आहेत. एकट्या महाराष्ट्रात 12 हजारांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. देशातील रुग्णांच्या तुलनेत 31% रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. रविवारी गुजरातमध्ये 374, पंजाब 330, तमिळनाडू 266, राजस्थान 60, हरियाणा 66, लद्दाख 19 सह 1200 पेक्षा जास्त नवीन रुग्ण सापडले आहेत.
हे आकडे covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आहेत. तर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार देशात 39 हजार 980 कोरोना संक्रमित आहेत. 28 हजार 46 रुग्णांवर उपचार सुरू आहे, तर 10 हजार 633 ठीक झाले आहेत. तसेच, देशभरात आतापर्यंत 1301 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
शनिवारी 2437 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. महाराष्ट्रात 790, दिल्लीत 384, गुजरातमध्ये 333, उत्तरप्रदेशात 159, पंजाबमध्ये 187, राजस्थानात 106, मध्यप्रदेशात 73 रुग्ण वाढले.
शुक्रवारी देशात संक्रमणाचे 2411 प्रकरणे समोर आली होती.
दिल्लीतील सीआरपीएफ मुख्यालयातील एका ड्रायव्हरला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर मुख्यालय सील करण्यात आले आहे. येथील 40 अधिकाऱ्यांना होम क्वारेंटाइन करण्यात आले आहे. यात एक स्पेशल डायरेक्टर जनरल रँकचा अधिकारी आणि डिप्टी इंस्पेक्टर जनरल सामील आहेत. सध्या सीआरपीएफमधील135 पेक्षा जास्त जवान संक्रमित झाले आहेत. तसेच, एकाचा मृत्यूही झाला आहे.
कोरोना चाचण्यांचा आकडा 10 लाखांच्या पुढे
कोरोनाच्या तपासणीला वेग आला आहे. आरटी-पीसीआर किटद्वारे दररोज जवळपास 70 हजार चाचण्या केल्या जात आहेत. शनिवारी संध्याकाळपर्यंत या तपासणीचा आकडा 10 लाखांपार झाला आहे. यातील 73 हजार 709 चाचण्यात शुक्रवारी सकाळी 9 वाजेनंतर करण्यात आल्या. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर)च्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 31 मार्चपर्यंत 47 हजार 852 नमुन्यांची चाचणी केली होती 30 एप्रिलपर्यंत ही संख्या 9 लाख 2 हजार 654 झाली. तर 1 मे ते 3 मे संध्याकाळपर्यंत हा आकडा 1 लाख 37 हजार 346 वर पोहोचला आहे. आरटी-पीसीआर किटमध्ये कोरोनाची तपासणी स्वॅबने केली जाते.
पूर्वी फक्त पुण्यात चाचण्या होत असत, आता देशभरात 389 लॅब
यापूर्वी कोरोनाची तपासणी केवळ पुण्यातील व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये केली जात होती. मार्चच्या तिसर्या आठवड्यापर्यंत 100 लॅब सुरू झाल्या. आता देशभरात 389 लॅबमध्ये ही तपासणी होत आहे. यामध्ये 292 सरकारी आणि 97 खासगी लॅब आहेत.
कोरोनावरील काही महत्त्वपूर्ण अपडेट
> देशभरातील तिन्ही सैन्य आज कोरोना वॉरियर्सचा अतिशय खास पद्धतीने सन्मान करत आहे. वायुदलाची विमाने फ्लाय पास्ट करत रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करत आहेत. भूदल सेनेचे जवान रुग्णालयांसमोर बँडवर सादरीकरण करत आहेत. तर वायू दल आणि कोस्ट गार्डच्या जहाजांवर संध्याकाळी साडेसात वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत रोषणाई केली जाणार आहे.
> गुजरातमधील दाहोद येथे पोलिसांवर कथितरित्या स्थलांतरित मजुरांनी दगडफेक केली. यामध्ये काही सरकारी वाहनांचे नुकसान झाले आहे. मात्र काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याचे जिल्हातील एसपींचे म्हणणे आहे. याप्रकरणी 40 लोकांना ताब्यात घेतले आहे.
> लॉकडाऊनमुळे भारतात अडकलेल्या 270 ब्रिटनच्या नागरिक आज कतार एअरवेजच्या विशेष विमानाने आपला देशाकडे रवाना झाले. रात्री 2.15 वाजता त्यांनी अमृतसरमधील श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.