आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates Novel Corona (COVID 19) Death Toll India 4 May 2020 News And Updates

देशात कोरोना:आतापर्यंत 43 हजार 506 प्रकरणे: मागील 24 तासात 1074 रुग्ण कोरोनामुक्त झाले, संक्रमितांचा रिकव्हरी रेट 27.52% झाला

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजपासून लॉकडाउनचा 3 टप्पा सुरू होत आहे, यामध्ये सरकारने ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त काही सवलती दिल्या आहेत

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 43 हजार 506 वर पोहोचली आहे.सोमवारी राजस्थानात 130, तमिळनाडू 527, आंध्रप्रदेशात 67, कर्नाटकात 28 आणि ओडिशात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. या दरम्यान केंद्राच्या पथकाने बंगालच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, राज्यात कोरोना संक्रमितांचा मृत्युदर 12.8% आहे, जो देशात सर्वाधिक आहे. येथे 100 संक्रमितांपैकी 13 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. 

एकट्या महाराष्ट्रात 13 हजार कोरोना पॉझिटिव्ह आहेत. हे एकूण संक्रमितांच्या 31% आहे. रविवारी महाराष्ट्रात 678, दिल्लीत 427, गुजरातमध्ये 374 पंजाबमध्ये 330, उत्तरप्रदेशात 158, राजस्थानात 114, मध्यप्रदेशात 49 यांसह 2676 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. 

ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात एकूण 42 हजार 537 कोरोनाग्रस्त आहेत. 29 हजार 453 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 11 हजार 706 बरे झाले आणि 1373 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

दिल्लीतील बीएसएफ मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव

दिल्लीच्या बीएसएफच्या मुख्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दिल्लीतील ब्लॉक 10 सीजीओ कॉम्प्लेक्समधील कार्यालय सध्या सॅनिटायझेशनसाठी बंद केले गेले आहे. येथे 3 मे रोजी रात्री उशीरा एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. तो 1 मे रोजी ऑफिसमध्ये आला होता. यापूर्वी दिल्लीतच बीएसएफचे 25 जवान संक्रमित झाले होते. ते जामा मशिदीजवळ तैनात होते. देशभरात 54 बीएसएफ जवान संक्रमित आहेत.

दरम्यान दिल्लीतील सीआरपीएफच्या 31 व्या बटालियनमधील आणखी दोन जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. आता या बटालियनमध्ये संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 137 झाली आहे. रविवारी सीआरपीएफ मुख्यालयात ड्रायव्हर पॉझिटिव्ह आढळला. यानंतर 40 अधिकाऱ्यांना क्वारंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आला. देशभरात सीआरपीएफच्या 146 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. 

दारूची दुकाने उघडण्याआधी लांबच लांब रांगा लागल्या 

देशभरात आजपासून लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. सरकारने ही बंदी दोन आठवड्यांसाठी वाढविली आहे. यासह, अनेक राज्यातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सवलती देखील सुरू झाल्या आहेत. सकाळपासून गोवा आणि आंध्र प्रदेशमध्ये सलून सुरू झाले. त्याचबरोबर कर्नाटकात सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत दारूची दुकाने उघडण्यास सरकारने परवानगी दिली आहे. स्टॅन्ड अलोन शॉपमधून दिल्लीतही मद्य विक्री केली जाऊ शकते. सकाळपासूनच या ठिकाणी लोकांच्या लांबच लांब रांगा दिसल्या.

पद्दुचेरीमध्ये दुकान-रेस्त्राँ उघडले, दारूच्या दुकानाबाबत कोणताही निर्णय नाही

पुद्दुचेरीमध्ये सोमवारीपासून कारखाने सुरू झाले. या केंद्र शासित प्रदेशात सकाळी 5 ते संध्याकाळी 6 या वेळेत सर्व दुकाने आणि रेस्टॉरंट्स उघडण्याची परवानगी आहे. मात्र, रेस्त्राँमधून खाद्यपदार्थ पार्सल घेता येतील. येथे दारूची दुकाने उघडण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. पद्दुचेरीमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण आहेत. यातील 6 जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...