आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates : Now More Than 10 Lakh Cases, 2.10 Lakh Infections Were Found In A Week

कोरोना देश:रुग्णांचा आकडा 10.36 लाखांवर; शुक्रवारी वाढले 31,500 पेक्षा जास्त रुग्ण, तर 665 पेक्षा जास्त मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आतापर्यंत देशभरात 10 लाख 36 हजार 751 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 6 लाख 51 हजार 330 रुग्ण ठीक झाले असून, 26 हजार 269 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 3 लाख 58 हजार 720 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org नुसार आहेत.

यापूर्वी , गुरुवारी एका दिवसात विक्रमी 35 हजार 468 रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी 15 जुलै रोजी 32 हजार 607 लोकांना संसर्ग झाली होती. गुरुवारी विक्रमी 22 हजार 834 रूग्ण बरे झाले ही दिलासादायक बाब आहे. हा आजपर्यंतच्या सर्वाधिक आकडा आहे. यापूर्वी 14 जुलै रोजी 20,968 रूग्ण बरे झाले होते. बरे झालेल्या लोकांची संख्या आता 6 लाख 36 हजार 569 झाली आहे.

यादरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी तिरुवनंतपुरममध्ये कम्यूनिटी संक्रमण होत असल्याचे मान्य केले आहे. मीडियाशी बातचीतदरम्यान विजयन म्हणाले की, तिरुवनंतपुरममधील काही कोस्टल एरिया जसे, पुंथूरा, पुलूविला यात कोरोनाचा कम्यूनिटी प्रसार सुरू आहे. ते म्हणाले की, याला रोखण्यासाठी योग्य पाऊले उचलली जात आहेत. केरळमध्ये आतापर्यंत 10,276 केस समोर आले असून, 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तिकडे, कर्नाटकचे मंत्री आर अशोक यांनी बंगळुरूमध्ये लॉकडाऊन वाढवणार नसल्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, शहरात लॉकडाउन 14 जुलैच्या रात्री 8 पासून लागू आहे आणि 22 जुलैला सकाळी पाचपर्यंत असेल. यानंतर लॉकडाऊन वाढवण्यार अद्याप कोणताच विचार झालेला नाही.

अपडेट्स...

महाराष्ट्रात 120 दिवसांपूर्वी, म्हणजेच 17 मार्चला कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. आता राज्यात हा आकडा 11 हजारांच्या पुढे गेला आहे. राज्यात दररोज सरासरी 93 जणांना मृत्यू होत आहे.

भारतीय औषध कंपनी जायडस कैडिलाला कोरोनाच्या उपचारासाठी त्यांचे औषध पेगाइलेटेड इंटरफेरॉन अल्फा -2 बी च्या क्लीनिकल ट्रायलची मंजूरी मिळाली आहे. ही मंजूरी मॅक्सिकोमधील रेग्युलेटरी अथॉरिटी कोफेप्रिसने दिली आहे. कंपनीने म्हटले की, त्यांनी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)कडून ट्रायलची मंजूरी मिळवली आहे.

सूरत-अहमदाबादमध्ये कोरोनाचे वाढते प्रकरण पाहता,  केंद्राची एक टीम येथे दौरा करणार आहे. या पथकात आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव, एम्सचे डायरेक्टर रणदीप गुलेरियासह चार सदस्य सामील आहेत.

बातम्या आणखी आहेत...