आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates: Record 16868 Cases In One Day, 4.74 Lakh Cases So Far

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देश:देशातील संक्रमितांचा आकडा 4.74 लाखांवर; महाराष्ट्रात जिम आणि सलून उघडण्यास परवानगी

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 4 लाख 74 हजार 410 झाला आहे. महाराष्ट्र सरकारने एका आठवड्याच्या आत जिम आणि सलूनला उघडण्याची परवानगी दिली आहे. यासाठी नवीन गाइडलाइन्सदेखील जारी केली जााईल. अशी माहिती मंत्री असलम शेख यांनी दिली. त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने आतापर्यंत धार्मिक स्थळांवर एकत्र येण्याबाबत निर्णय घेतलेला नाही.

दरम्यान, देशातील संक्रमितांचा आकडा 4 लाख  81 हजार 177 झाला आहे. तर, आज 135 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात एकूण  15,042 रुग्णांचा बळी गेला आहे. सध्या देशभरात 1 लाख 88 हजार 315 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत 2 लाख 77 हजार 765 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

यापूर्वी बुधवारी एका दिवसात सर्वात जास्त 16 हजार 753 केस वाढले. हा आकडा आतापर्यंतचा सर्वात जास्त आकडा आहे. यापूर्वी 20 जूनला 15 हजार 918 संक्रमित सापडले होते. दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनाचा रिकिव्हरी रेट 6 % वाढून 56.38% झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...