आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates : Record Increase Of 32607 Patients In One Day, 9.70 Lakh Cases So Far

कोरोना देश:संक्रमितांचा आकडा 10 लाखांच्या पुढे; फक्त तीन दिवसात वाढले 1 लाख रुग्ण; आतापर्यंत 25 हजारांपेक्षा जास्त मृत्यू

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशासाठी चांगली बातमी नाही. देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्याने गुरुवारी 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. यात वाईट गोष्ट म्हणजे, संक्रमण आता वेगाने वाढत आहे. 13 जुलैपर्यंत देशात 9 लाख संक्रमित होते, फक्त तीन दिवसात 1  लाख संक्रमित वाढले. तसेच, आतापर्यंत देशभरात 25 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब म्हणजे, दहा लाखांपैकी 6 लाख 16 हजार 453 रुग्ण ठीक झाले आहेत, तर 3 लाख 34 हजार 826 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.

दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे की कोरोनामुळे आतापर्यंत देशात 99 डॉक्टरांनी प्राण गमावले आहेत. एकूण 1302 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. आम्ही डॉक्टरांना खबरदारी घेण्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. बुधवारी 32 हजार 607 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. ही आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. 

कोरोना अपडेट्स 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार गेल्या 24 तासांत 32 हजार 695 प्रकरणे वाढली आणि 606 लोक मरण पावले. यासह देशात आतापर्यंत 9 लाख 68 हजार 876 प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये 3 लाख 31 हजार 146 अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. त्याचबरोबर 6 लाख 12 हजार 815 रुग्ण बरे झाले आहेत. त्याचबरोबर 24 हजार 915 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयएमसीआर) च्या म्हणण्यानुसार, देशात 15 जुलैपर्यंत 1 कोटी 27 लाख 30 हजार 490 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मागील 24 तासांत 3 लाख 26 हजार 826 तपासण्या करण्यात आल्या आहेत.