आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases LIVE Updates, The Number Of Corona Patients In The Country Is 7 Lakh 98 Thousand 128

कोरोना देश:देशातील कोरोना रुग्णांची संख्या आता आठ लाखांच्या पार, पाच लाखांपेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात, आतापर्यंत 21 हजार 836 जणांचा झाला मृत्यू

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 21 हजार 836 मृत्यू झाले आहेत, महाराष्ट्रात सर्वात जास्त 9667 जणांनी जीव गमावला आहे
  • उत्तर प्रदेशात आज रात्री 10 वाजेपासून 13 जुलैच्या सकाळपर्यंत लॉकडाऊन

 देशात कोरोना संक्रमितांची संख्या 8 लाख 6 हजार 53 झाली आहे. तर, पुण्यात 13-23 जुलै दरम्यान संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आलंय. या काळात केवळ आवश्यक सेवा सुरू राहतील. शुक्रवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, देशात दररोज दोन लाखांहून अधिक चाचण्या घेतल्या जात आहेत. एवढ्या मोठ्या देशातील ही एक मोठी कामगिरी आहे. आम्ही चाचण्यांची संख्या सतत वाढवत आहोत जेणेकरून अधिक प्रकरणे समोर येऊ शकतील.

हर्षवर्धन म्हणाले, "आतापर्यंत छोटे परिसर सोडले तर कुठेही कम्युनिटी ट्रांसमिशन झालेले नाही. " छोट्या छोट्या भागात हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत आहे. दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हरी रेट हा वाढत आहे. आता रिकव्हरी रेट वाढून 63% झाला आहे. 

कोरोना संक्रमितांची संख्या 8 लाखांच्या पार 
देशात कोरोना संक्रमितांचा आकडा शुक्रवारी 8 लाख 6 हजार 53 झाला. दिलासादायक बाब म्हणजे यामधील 5 लाख 4 हजार 333 रुग्ण बरेही झाले आहेत. तर 21 हजार 836 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

0