आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एमएस धोनीच्या पालकांना कोरोना:धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण, रांचीच्या खासगी रुग्णालयात दाखल; दोघांची प्रकृती स्थिर -डॉक्टर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळवारी विक्रमी 2.94 लाख लोक संक्रमित आढळले

इंटरनॅशनल क्रिकेटर महेंद्र सिंह धोनींचे वडिल पान सिंह धोनी आणि आई देवकी देवी कोरोना संक्रमित आढळले आहेत. दोघांनाही रांचीच्या एका खासगी रुग्णालात दाखल करण्यात आले आहे. क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आयपीएलमध्ये व्यस्त असताना त्याचे आई-वडील आजारी पडले आहेत.

डॉक्टर्सनुसार, दोघांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांची ऑक्सिजन लेव्हलही सामान्य असल्याची माहिती देण्यात आली आहे. सीटी स्कॅन करण्यात आला आहे, ज्यावरुन कळते की, सध्या संक्रमण त्यांच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेले नाही. यामुळे जास्त त्रास होण्याचा धोका नाही. यामुळे दोघांच्या प्रकृतीमध्ये लवकरच सुधारणा होऊन ते निगेटिव्ह येतील आणि त्यांना डिस्चार्ज मिळेल, अशी आशा व्यक्त केली जातेय.

मंगळवारी विक्रमी 2.94 लाख लोक संक्रमित आढळले
मंगळवारी कोरोनाच्या आकड्यांचा नवा विक्रम नोंदवण्यात आला. पहिल्यांदाच एका दिवसाच्या आत जास्त नवीन रुग्ण समोर आले. सर्वात जास्त मृत्यू झाले आणि बरे होणाऱ्यांचाही विक्रम बनला आहे. गेल्या 24 तासांच्या आत 2 लाख 94 हजार 115 लोक संक्रमित आढळले आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एका दिवसात सापडलेल्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

या 24 तासांमध्ये संक्रमणामुळे 2020 लोकांनी जीव गमावला आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये एका दिवसाच्या आत 2004 मृत्यू नोंदवण्यात आले होते. खरेतर काही जुन्या मृतांचा आकडाही येथे जोडण्यात आला होता. या दरम्यान दिलासादायक गोष्ट म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 66 हजार 520 लोक बरे झाले आहेत. रिकव्हरीचा हा आकडाही आतापर्यंत सर्वात जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...