आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases New Corona Strain Vaccination Live Updates 07 May 2021

कोरोनाचा नवा विक्रम:देशात गेल्या 24 तासांमध्ये 4.14 लाख नवीन रुग्ण आढळले, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा; उपचार करत असलेल्या संक्रमितांची संख्या 36 लाखांच्या पार

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकूण अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 27 लाख केवळ 10 राज्यांचे आहेत.

देशात कोरोनाच्या नवीन रुग्णांनी पुन्हा विक्रम केला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 4.14 लाख संक्रमित आढळले आहेत. नवीन रुग्णांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. 3,920 रुग्णांनी या महामारीमध्ये जीव गमावला आहे. खरेतर दिलासादायक गोष्ट म्हणजे 3.28 लाख रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या सात दिवसांमध्ये ही तिसरी वेळ आहे जेव्हा 4 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी 30 एप्रिलला 4.02 लाख आणि 5 मे ला 4.12 लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.

अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवत आहेत. यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 81,663 ची वाढ झाली आहे. सध्या 36.44 लाख संक्रमितांवर उपचार सुरू आहे. गेल्या 7 दिवसांच्या आत 3.80 लाखांची वाढ झाली आहे. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 27 लाख केवळ 10 राज्यांचे आहेत.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये
गेल्या 24 तासांमध्ये एकूण केस आल्या :4.14 लाख
गेल्या 24 तासांमध्ये एकूण मृत्यू :3,920
गेल्या 24 तासांमध्ये एकूण बरे झाले :3.28 लाख
आतापर्यंत एकूण संक्रमित झाले :2.14 कोटी
आतापर्यंत बरे झाले : 1.76 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू : 2.34 लाख
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या :36.44 लाख

बातम्या आणखी आहेत...