आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, New Corona Strain & Vaccination LIVE Updates 11 March 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:महाराष्ट्रात 15 दिवसांमध्ये दुप्पट झाला संक्रमणाचा वेग, 24 तासांमध्ये 13,659 प्रकरणे आले; हे गेल्या 150 दिवसांमध्ये सर्वात जास्त

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात गेल्या 24 तासांमध्ये 21,814 नवीन रुग्ण समोर आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोना संक्रमण वेगाने वाढत आहे. येथे गेल्या 24 तासांमध्ये 13,659 नवीन रुग्ण आढळले आहेत. हा 7 अक्टोबरनंतर सर्वात मोठा आकडा आहे. तेव्हा 14,578 केस आल्या होत्या. जवळपास 15 दिवसांपूर्वी येथे 5-6 हजार केस आल्या होत्या. देशात सध्या 60% पेक्षा जास्त रुग्ण येथे सापडत आहेत.

देशात गेल्या 24 तासांमध्ये 21,814 नवीन रुग्ण समोर आले आहेत. 17,674 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये 114 जणांनी जीव गमावला आहे. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये 4,020 ची वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण 1.12 कोटी लोक या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. 1.09 कोटी लोक बरे झाले आहेत. 1.58 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1.85 लाख जणांवर उपचार सुुरू आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

राज्यात बुधवारी 13,659 लोक कोरोना संक्रमित आढळले. 9,913 लोक बरे झाले आणि 54 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात 22 लाख 52 हजार 57 लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 20 लाख 99 हजार 207 लोक बरे झाले आहेत. तर 52,610 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 99,008 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...