आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, New Corona Strain & Vaccination LIVE Updates 14 March 2021

कोरोना देशात:अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांने पुन्हा एकदा ओलांडला 2 लाखांचा आकडा; यामध्ये 1.18 लाख एकट्या महाराष्ट्रात, 31 हजार रुग्णांसह केरळ दुसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रामध्ये शनिवारी 15,602 लोक कोरोना संक्रमित आढळले आणि 7,467 रुग्ण बरे झाले

देशात कोरोना संक्रमणाचा वेग दिवसांदिवस झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 25,154 नवीन रुग्ण आढळले आहेत. 16,519 संक्रमित बरे झाले आहेत. तर 159 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे अ‍ॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 8,477 ची वाढ झाली. आता अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा एकूण आकडा 2 लाखांच्या पुढे जाऊन 2 लाख 7 हजार 499 झाला आहे. हा 11 फेब्रुवारीला 1 लाख 33 हजार 79 वर पोहोचला होता. 17 सप्टेंबरला आलेल्या कोरोना पीक (10.17 लाख) नंतर हे सर्वात कमी होते.

देशात आतापर्यंत 1.13 कोटी संक्रमित
देशात आतापर्यंत 1.13 कोटी लोक या आजाराच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 1.09 कोटी बरे झाले आहेत. 1.58 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2.07 लाख जणांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

महाराष्ट्रामध्ये शनिवारी 15,602 लोक कोरोना संक्रमित आढळले आणि 7,467 रुग्ण बरे झाले तर 88 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 22.97 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 21.25 लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर 52,811 संक्रमितांनी जीव गमावला आहे. सध्या 1.18 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...