आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, New Corona Strain & Vaccination LIVE Updates 16 March 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:गेल्या 15 दिवसांमध्ये जवळपास 3 लाख नवीन रुग्ण आढळले, 1700 जणांनी गमावला जीव; उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये 54 हजारांपेक्षा जास्त वाढ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत एकूण 1 कोटी 14 लाख 9 हजार 595 लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत.

देशात पुन्हा एकदा 20 हजारांपेक्षा जास्त संक्रमित आढळले आहेत. सोमवारी 24,437 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 20,186 बरे झाले आहेत आणि 130 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 4,104 ची वाढ झाली आहे. या महिन्यात 15 दिवसांमध्ये 2 लाख 97 हजार 539 नवीन रुग्ण सापडले आहेत. 2 लाख 41 हजार 63 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1,698 रुग्णांनी जीव गमावला आहे.

देशात आतापर्यंत एकूण 1 कोटी 14 लाख 9 हजार 595 लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 1 कोटी 10 लाख 25 हजार 631 बरे झाले आहेत. 1 लाख 58 हजार 892 ने जीव गमावला आहे. तर 2 लाख 20 हजार 401 जणांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

येथे सोमवारी 15,051 लोक कोरोना संक्रमित आढळले आहेत आणि 10,671 रुग्ण बरे झाले आहेत. तर 48 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 23.29 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 21.44 लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर 52,909 संक्रमितांनी जीव गमावला आहे. सध्या 1.30 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...