आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, New Corona Strain & Vaccination LIVE Updates 17 March 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:एकाच दिवसात जवळपास 29 हजार प्रकरणे आली, 187 जणांचा झाला मृत्यू; नवीन संक्रमितांमध्ये सर्वात जास्त 18 हजार महाराष्ट्रात

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत एकूण 1 कोटी 14 लाख 38 हजार 464 लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत.

देशात मंगळवारी 28,869 कोरोना पॉझिटिव्ह आढळले.17,746 बरे झाले आणि 187 जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 10,935 ची वाढ झाली. नवीन संक्रमितांचा आकडा जवळपास तीन महिने मागे गेला आहे. यापेक्षा जास्त 30,354 केस 12 डिसेंबरला आल्या होत्या. मंगळवारी नवीन संक्रमितांमध्ये सर्वात जास्त 17,864 रुग्ण केवळ महाराष्ट्रातच आढळले होते.

देशात आतापर्यंत एकूण 1 कोटी 14 लाख 38 हजार 464 लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 1 कोटी 10 लाख 43 हजार 337 बरे झाले आहेत. 1 लाख 59 हजार 79 ने जीव गमावला आहे. तर 2 लाख 31 हजार 335 जणांवर उपचार सुरू आहेत. हे आकडे covid19india.org

येथे मंगळवारी 17,864 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आणि 9,510 रुग्ण बरे झाले आणि 87 जणांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 23.47 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यामधून 21.54 लाख रुग्ण असे आहेत जे बरे झाले आहेत. तर 52,996 संक्रमितांनी जीव गमावला आहे. सध्या 1.38 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...