आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, New Corona Strain & Vaccination LIVE Updates 18 March 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:24 तासांमध्ये जवळपास 36,000 रुग्ण आढळले, हे 101 दिवसांमध्ये सर्वात जास्त; अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आज 2.5 लाखांच्या पार होणार

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आता एकूण 1 कोटी 14 लाख 74 हजार 302 लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत.

देशात कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्याचा आकडा सातत्याने वाढत आहे. बुधवारी 35,838 लोक पॉझिटिव्ह आढळले. 17,793 बरे झाले आणि 171 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच उपचार करत असलेले रुग्ण म्हणजेच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 2 लाख 49 हजार 197 झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 17,862ची वाढ झाली आहे. नवीन संक्रमितांचा आकडा 5 डिसेंबररनंतर म्हणजेच 101 दिवसांमध्ये सर्वात जास्त आहे. 5 डिसेंबरला 36,010 केस आल्या होत्या. यानंतर यामध्ये घट होत राहिली.

देशात आता एकूण 1 कोटी 14 लाख 74 हजार 302 लोक या महामारीच्या विळख्यात सापडले आहेत. 1 कोटी 10 लाख 61 हजार 170 रुग्ण बरे झाले आहे. तर 1 लाख 59 हजार 250 लोकांचा मृत्यूही झाला आहे. हे आकडे covid19india.org वरुन घेतले आहेत.

तर महाराष्ट्रात बुधवारी 23,179 लोक कोरोना संक्रमित आढळले आणि 9,138 रुग्ण बरे झाले तर 84 लोकांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 23.70 लाख लोक संक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. यामधून 21.63 लाख रुग्ण बरे झाले आहेत. तर 53,080 संक्रमितांनी जीव गमावला आहे. सध्या 1.72 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...