आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, New Corona Strain & Vaccination LIVE Updates 7 March 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:दिल्लीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 300 पेक्षा जास्त संक्रमित आढळले; 15 राज्यात बरे होणाऱ्यांपेक्षा जास्त रुग्ण येत आहेत समोर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 तासांमध्ये 18 हजारांपेक्षा जास्त रुग्ण मिळाले

देशात कोरोना रुग्ण सलग वाढत आहेत. महाराष्ट्रानंतर आता दिल्लीमध्ये कोरोना पाय पसरवताना दिसत आहे. येथे सलग दुसऱ्या दिवशी 300 पेक्षा जास्त कोरोना प्रकरणे समोर आले आहेत. येथे शनिवारी 321 कोरोना संक्रमित आढळले. तर शुक्रवारी 312 लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तर गेल्या 6 दिवसांमध्ये येथे 444 अॅक्टिव्ह केस वाढल्या आहेत, म्हणजेच येथे रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दुसरीकडे गेल्या 24 तासांमध्ये देशाच्या 15 राज्यांमध्ये कोरोना मुक्त होणाऱ्यांपेक्षा जास्त नवे रुग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रातही सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांपेक्षा जास्त नवीन केस समोर येत आहेत. तर पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि मध्यप्रदेशात कोरोनाचे नवीन प्रकरणे सलग वाढत आहेत.

24 तासांमध्ये 18 हजारांपेक्षा जास्त रुग्ण मिळाले
गेल्या 24 तासांच्या आत 18 हजार 684 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 14 हजार 338 लोक रिकव्हर झाले आणि 98 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1 कोटी 12 लाख 10 हजार लोक संक्रमित आढळले आहेत. यामध्ये 1 कोटी 8 लाखांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. तर 1 लाख 57 हजार 791 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 लाख 81 हजार 644 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...