आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, New Corona Strain & Vaccination LIVE Updates 8 March 2021

कोरोना देशात:सरकारकडून चाचण्यांमध्ये वाढ नाही; एक महिन्यापूर्वी दररोज 8-10 हजार रुग्णांमागे 7-8 लाख चाचण्या होत होत्या, आता 18 हजार रुग्णांमागेही तेवढ्याच चाचण्या

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत देशात 1 कोटी 12 लाख 29 हजारांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत.

देशात कोरोना संक्रमितांची संख्या सलग वाढत आहे. रविवारी 18,650 नवीन रुग्ण आढळले. सलग तिसऱ्या दिवशी हा आकडा 18 हजारांच्या पार गेला आहे. 14,303 रुग्ण बरे झाले आणि 97 जणांनी जीव गमावला. अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये 4,246 ची वाढ झाली आहे. आता एकूण 1 लाख 85 हजार 886 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

चिंतेची बाब म्हणजे संक्रमणाचे प्रकरणे वाढूनही सरकारकडून चाचण्या वाढवल्या जात नाहीतेय. 8-10 फेब्रुवारीच्या काळात जेव्हा दररोज 8-10 हजार रुग्ण समोर येत होत्या तेव्हा रोज 6-7 लाख चाचण्या केल्या जात होत्या. आता जेव्हा नवीन संक्रमितांचा आकडा दुप्पट होऊन 18 हाजरांच्या पार केला आहे. तेव्हाही रोज 7.50 लाख चाचण्याच केल्या जात आहेत.

आतापर्यंत 1.12 कोटी रुग्ण
आतापर्यंत देशात 1 कोटी 12 लाख 29 हजारांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 1 कोटी 8 लाख 80 हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. 1 लाख 57 हजार 890 रुग्णांचा मृत्यू जाला. 1 लाख 85 हजार 886 रुग्णांवर अजुनही उपचार सुरू आहे.

आरोग्यमंत्री म्हणाले - भारतात कोरोना संपत आहे
दरम्यान देशाचे आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, भारतात कोरोना आता संपण्याच्या मार्गावर आहे. त्यांनी म्हटले की, या टप्प्यावर यशस्वी होण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी मान्य करण्याची गरज आहे. लसीकरण अभियानापासून राजकारण दूर ठेवा, लसीमागील विज्ञानावर विश्वास ठेवा आणि ठरवा की, आपल्या लोकांना योग्य वेळी लस देण्यात यावी.

बातम्या आणखी आहेत...