आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केरळमध्ये कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवणे कठीण होत आहे. येथे दररोज 5-6 हजार नवीन रुग्ण आढळत आहेत. शनिवारी 6293 नवीन रुग्णांची नोंद झाली, 4749 बरे झाले आणि 29 जणांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 1515 ची वाढ झाली. राज्यात सध्या 60 हजार 410 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याबाबत केरळ महाराष्ट्राला मागे टाकू शकते. महाराष्ट्रात एकूण 61 हजार 95 अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. येथे शनिवारी 3940 नवीन रुग्णांची नोंद झाली.
शनिवारी देशभरात 26 हजार 834 नवीन रुग्ण आढळले. 29 हजार 758 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 342 जणांचा मृत्यू झाला. देशातील रुग्णसंख्या 1 कोटी 31 हजार झाली आहे. यातील 95.79 लाख रुग्ण बरे झाले आहेत आणि 1.45 लाख रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरात सध्या 3.03 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोना अपडेट्स
मागील नऊ महिन्यांत रेल्वेचे सुमारे 30 हजार कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले. यापैकी 700 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. रेल्वे बोर्डाचे चेअरमन विनोद कुमार यांनी शनिवारी ही माहिती दिली.
कर्नाटकात 10 वी आणि 12 वीचे क्लासेस 1 जानेवारीपासून सुरू केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पालकांची लिखित परवानगी घ्यावी लागणार आहे. सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांचा विद्यागम कार्यक्रमही 1 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
देशात जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. आरोग्य मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनुसार, पुढील काही आठवड्यात काही लसींना आपत्कालीन परवानगी मिळू शकते. दोन कंपन्यांनी यासाठी अर्ज केला आहे. दरम्यान सही कंपन्यांच्या लसी वैद्यकीय चाचण्यांच्या अॅडवान्स स्टेजमध्ये आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, ऑगस्टपर्यंत 30 कोटी लोकांच्या लसीकरणावर सरकार 13 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. पहिल्या टप्प्यातील खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.