आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, Novel Corona (COVID 19) Death Toll India Today News And Updates

देशात कोरोना:देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 172 झाली आहे; चार दिवसात रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ, लॉकडाउन संपेपर्यंत आकडा 17 हजारांच्या घराज जाण्याची शक्यता

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्य मंत्रालयानुसार देशात कोरोना संक्रमणाच्या प्रसाराची स्थिती स्टेज -2 आणि स्टेज -3 दरम्यान आहे

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 हजार 172 झाला आहे. मंगळवारी 421 नवीन रुग्ण आढळले आहेत. यात महाराष्ट्रात सर्वात जास्त 150 रुग्ण आढळले, आता राज्यातील रुग्णांची संख्या 1018 झाली आहे. त्यापाठोपाठ तमिळनाडूमध्ये सर्वात जास्त 69 रुग्ण. तर, राजस्थान 27, हरियाणा 33, गुजरात  29, मध्यप्रदेश-कर्नाटक 12-12, प.बंगाल-पंजाब 11-11, ओडिशा 2, असम आणि आंध्रप्रदेशात 1-1 रिपोर्ट पॉझिटिव्ह रुग्ण आहे. हे आकडे covid19india.org वेबसाइटनुसार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, देशातील लॉकडउनचा कालावधी वाढवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला  नाही. तसते. कृपया याबाबत कोणताही तर्क-वितर्क लावू नये असेही सांगितले. याआधी एएनआय वृत्तसंस्थेने सरकारच्या सुत्रांच्या हवाल्यानुसार सांगितले होते की, केंद्र सरकार अनेक राज्य सरकारे आणि तज्ज्ञांच्या विनंतीनंतर लॉकडउन वाढवण्याबाबत विचार करत आहे.  यापूर्वी तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही 3 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यास सांगितले होते. एका आठवड्यापूर्वी ते स्वत: राज्य कोरोनामुक्त घोषित करण्याची तयारी करत होते. उत्तर प्रदेश सरकारनेही लॉकडाऊन वाढविण्याचे संकेत दिले आहेत. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी म्हणाले होते की 14 एप्रिलला राज्यातील लॉकडाऊन हटवण्यात येईल याबाबत काही सांगणे शक्य नाही. 

सरकारच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे 
> वेगवेगळ्या केंद्रीय मंत्रालयांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मंगळवारी कळविण्यात आले की कोरोना व्यवस्थापनासाठी धोरण आखण्यात आले आहे. याबाबत सर्व राज्यांना माहिती देण्यात आली आहे. आग्रा, भीलवाडा यासह काही ठिकाणी याचे चांगले परिणाम दिसत आहेत. मुंबईतही याअंतर्गत काम सुरु आहे.
> पुणे, बंगळुरू, मंगळुरू आणि तुमकुरुमध्ये तांत्रिक मदतीने लोकांना क्वारंटाइन केले जात आहे. यामध्ये रिअर टाइम ट्रॅकिंग केली जात आहे. 
> हॉस्टेल, लॉज, स्टेडियम आणि पूर्वीपासून उपलब्ध असलेल्या सुविधांचा कोविड केअर सेंटर म्हणून वापर केला जाऊ शकतो. गंभीर रुग्णांना डेडिकेटेड कोविड आरोग्य केंद्रात ठेवले जाईल.
> रेल्वेने 2000 हून अधिक डब्यांचे आयसोलेशन सेंटरमध्ये रुपांतर केले आहे. यासाठी संपूर्ण देशात काम सुरू आहे. 
> सर्व राज्यांच्या डीएमसोबत मिळून कोरोनाचा सामना करण्यासाठी तयारी केली जात आहे. दुर्बल घटकातील लोकांना गरीब कल्याणकारी योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जातात.
> सोशल डिस्टन्सबाबत एक अभ्यास समोर आला आहे. यामध्ये सांगण्यात आले की, एका कोरोनाग्रस्ताने लॉकडउनचे पालन केले नाही तर 30 दिवसांत 406 लोकांना संक्रमित करू शकतो. जर ते कमी केले तरी 206 लोकांना संक्रमित करू शकतो. अशा परिस्थितीत आपण लॉकडउनचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोना रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सचे पालन करा. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांना लॉकडाउननंतरचा अॅक्शन प्लॅन तयार करण्याचे निर्देश दिले होते. यादरम्यान त्यांनी हा लॉकडाउन हळूहळून हटवण्याचे संकेत दिले होते. 
दरम्यान कोरोनाव्हायरचा संसर्ग दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेज दरम्यान पोहोचला आहे. सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. मागील 8 दिवसांत पहिल्यांदाज असे घडले की, नवी प्रकरणांची संख्या घट नोंदली गेली. दिवसभरात 488 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 28 मार्च रोजी संक्रमितांची संख्येत 141 ची वाढ झाली होती. पुढच्या दिवशी यात कमतरता आली आणि 115 नवीन प्रकरणे समोर आली होती. यानंतर दररोज संक्रमितांच्या संख्या वाढली.

भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची निर्यात बंदी केली शिथील
कोरोना व्हायरसविरोधात लढताना भारत सरकारने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि पॅरासिटामॉल औषधींवर आंशिक निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘हा निर्णय मानवतेच्या आधारावर घेण्यात आला आहे. भारताकडून अपेक्षा ठेवणाऱ्या देशांना या औषधी पाठवल्या जाणार आहेत. तरीही देशांतर्गत गरजांना प्रथम प्राधान्य देऊन स्टॉकच्या उपलब्धतेनुसार निर्यात केले जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आवाहन केले होते की कोरोनाशी दोन हात करताना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन निर्यात करावे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, ‘‘या औषधी कोरोनाचा सर्वात वाइट फटका बसलेल्या देशांना पाठवल्या जाणार आहेत. या संपूर्ण प्रकरणाला कुठल्याही प्रकारचे राजकीय रंग देऊ नका. यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण नाही.’’ वैज्ञानिकांनी सुद्धा मलेरियाविरोधी काम करणारे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध कोरोना विरोधात यशस्वी असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...