आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात मागील 24 तासात संक्रमणाच्या 73,220 केस आढळून आल्या असून 82,292 रुग्ण बरे झाले आहेत. संक्रमितांचा आकडा 69 लाख 77 हजार 8 झाला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे यापैकी 59 लाख 85 हजार 505 रुग्ण बरे झाले आहेत. 8 लाख 82 हजार 997 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मृतांचा आकडा 1.07 लाख झाला आहे. हे आकडे covid19india.org नुसार आहेत.
कोरोना संक्रमण पाहता यावेळी गुजरात सरकारने राज्यामध्ये गरबा मोह्त्सवाची परवानगी नाकारली आहे. फक्त मूर्ती स्थापित करून पूजा-आरती केली जाऊ शकते. मूर्तीला स्पर्श करण्याची परवानगी नाही. संपूर्ण देशासाठी दिलासादायक गप्ष्ट म्हणजे मागील तीन आठवड्यांपासून नवीन संक्रमित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.