आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 47 हजार 369 वर पोहचली, 10 राज्ये सर्वाधिक प्रभावित

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हे चित्र दिल्लीचे आहे. ट्रेनची वाट पाहत असलेला प्रवासी आपल्या मुलाला वर्तमानपत्राने हवा घालत आहे. - Divya Marathi
हे चित्र दिल्लीचे आहे. ट्रेनची वाट पाहत असलेला प्रवासी आपल्या मुलाला वर्तमानपत्राने हवा घालत आहे.
  • आंध्रात एका आठवड्यात संसर्गाचा वेग सर्वात कमी 2%, बिहारमध्ये सर्वाधिक 11%

देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 47 लाख 369 झाली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला. यानंत तमिळनाडू, गुजरात,  दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश आणि बिहारमध्ये आहे. यांपैकी मागील आठवड्यात सर्वात कमी वेग आंध्रप्रदेश आणि सर्वाधिक महाराष्ट्र वाढला. आंध्रप्रदेश दररोज सरासरी 2% रुग्ण वाढले आणि बिहारमध्ये 11% दराने रुग्णांत वाढ झाली.  ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात 1 लाख 45 हजार 380 संक्रमित आहेत. यामधील 80 हजार 722 जणांवर उपचार सुरु आहेत. 60 हजार 490 बरे झाले असून 4167 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या उपचारात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन वापरणे सुरू ठेवेल - आयसीएमआर

आयसीएमआरने मंगळवारी म्हटले की, कोविड-19 च्या उपचारात हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू)चा उपयोग कायम राहील. आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल डॉक्टर बलराम भार्गव म्हणाले की, काउंसिलला हे टॅब्लेट खूप प्रभावी असल्याचे आढळले आहे. त्याचे दुष्परिणामही कमी पाहिले गेले आहेत.

आयसीएमआरचे विधान महत्त्वपूर्ण ठरले आहे कारण डब्ल्यूएचओने एक दिवसापूर्वी कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी मलेरिया औषध एचसीक्यूच्या क्लिनिकल चाचणीवर तात्पुरती बंदी घातली होती.

सरकारने एचसीक्यूबाबत अॅडव्हायजरी जारी केली होती

सरकारने नुकतीच एचसीक्यू वापरण्याबाबत सुधारित सुचना जारी केली होती. यामध्ये म्हटले होते की, नॉन कोविड-19 रुग्णालयांत काम करणारे लक्षण नसलेले आरोग्य कर्मचारी या औषधाचा वापर करू शकतात. यासोबत सुरक्षा कर्मचारी देखील या औषधाचे सेवन करू शकतील. 

कोरोना दरम्यान केरळमध्ये परीक्षा सुरू

केरळमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. तिरुअनंतपुरममध्ये परीक्षा देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सद्वारे रांगेत उभे करण्यात आले. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यापूर्वी सर्वांचे तापमानाचे तपासणी केली. सर्व विद्यार्थ्यांचे हात देखील सॅनिटाइज करण्यात आले. 

- दिल्ली सरकारने प्रवाशांसाठी नवीन गाईडलाईन जारी केली आहे. दिल्लीत येणाऱ्या प्रवाशांना मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. संक्रमणाची लक्षणे दिसली नाही तरी 14 दिवस स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.

- विमान मंत्रालयाने नॉन-शेड्यूल्ड प्रायव्हेट विमान सेवेला परवानगी दिली आहे. यामध्ये फिक्स्ड विंग, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टरचा समावेश आहे.

- 25 मेपर्यंत 3274 श्रमिक स्पेशल ट्रेन चालवण्यात आल्या. याद्वारे 44 लाख प्रवाशांनी प्रवास केला. 25 मे रोजी 223 स्पेशल रेल्वेगाड्या चालल्या, यातून 2 लाख 80 हजार लोकांनी प्रवास केला. 

- फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (एफडब्ल्यूईसी) ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये माध्यम आणि करमणूक उद्योगात काम सुरू करण्यासाठी एक मार्गदर्शक सूचना प्रस्तावित करण्यात आली आहे.

- महाराष्ट्रात मागील 24 तासांत 80 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तर दोघांचा मृत्यू देखील झाला आहे. पोलिस विभागातील 1889 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 838 बरे झाले असून 20 जणांचा बळी गेला. 

बातम्या आणखी आहेत...