आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:3 महिन्यांनंतर ऍक्टिव्ह रुग्ण 6 लाखांपेक्षा कमी झाले, 24 तासात 10 हजार केस कमी झाल्या, आतापर्यंत 80.87 लाख केस

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना रुग्णांचा आकडा 80 लाख 87 हजार 428 झाला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे यामध्ये 73 लाख 71 हजार 568 लोक बरे झाले आहेत. संक्रमणामुळे आतापर्यंत 1 लाख 21 हजार 130 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यासोबतच 85 दिवस म्हणजे 3 महिन्यांनंतर ऍक्टिव्ह केस 6 लाखांपेक्षा कमी झाल्या आहेत. सध्या देशात 5 लाख 93 हजार 698 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यातील काही रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत तर काही आयसोलेशन सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. यापूर्वी 5 ऑगस्टला देशात 5 लाख 94 हजार ऍक्टिव्ह केस होत्या.