आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:1 लाख 11 हजार 696 केस, 25 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या सॅम्पलची तपासणी पूर्ण - आयसीएमआर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळवारी संक्रमणाचे 6141 रुग्ण आढळून आले

देशात कोरोना संक्रमितांची संख्या 1 लाख 11 हजार 696 वर पोहोचली आहे. बुधवारी  5 हजारांपेक्षा जास्त नवीन संक्रमित आढळले आहेत. यात सर्वात जास्त 2250 महाराष्ट्रातील आहेत, त्यानंतर तमिळनाडू 743, दिल्ली 534, गुजरात 398, मध्यप्रदेश 270 रुग्ण आढळले आहेत. हे आकडे covid19india.org आणि राज्य सरकारच्या माहितीनुसार आहे.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 25 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या सॅम्पलची तपासणी पूर्ण झाली आहे. मागील 24 तासात एक लाख 8 हजार 121 पेक्षा जास्त टेस्ट करण्यात आल्या आहेत.आसाममध्ये मागील 24 तासात 2 महिन्याच्या बाळासहित 42 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत . एक दिवसातील हा संक्रमितांचा आसाममधील सर्वात मोठा आकडा आहे. यासोबतच राज्यातील संक्रमितांची संख्या 157 झाली आहे.

मंगळवारी संक्रमणाचे 6141 रुग्ण आढळून आले असून 3030 रुग्ण बरे झाले आहेत. यापूर्वी एका दिवसात सर्वात जास्त 5049 रुग्ण 17 मे रोजी आढळून आले होते. 20 मे रोजी एकट्या महाराष्ट्रात 2078 रुग्ण वाढले. राज्यात सलग चौथ्या दिवशी 2 हजार पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. या व्यतिरिक्त तामिळनाडूमध्ये 688, दिल्लीमध्ये 500, गुजरातमध्ये 395, राजस्थानमध्ये 338, उत्तरप्रदेशमध्ये 321, मध्यप्रदेशमध्ये 229 रुग्ण आढळून आले आहेत.

हे आकडे covid19india.org आणि राज्य सरकारकडून मिळलेल्या माहितीनुसार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 1 लाख 1 हजार 139 संक्रमित आहेत. 58 हजार 802 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 39 हजार 173 रुग्ण बरे झाले असून 3163 जणांचा मृत्यू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...