आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases Updates : The Number Of Patients In India Is Over 5.29 Lakh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देश कोरोना:देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 5.50 लाख पार, आता दर 3 दिवसांत वाढताहेत 50 हजार रुग्ण

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील कोरोनाबाधितांची संख्या साडेपाच लाख पार झाली आहे. तीन दिवसांपूर्वी हा आकडा पाच लाख पार झाल होता. देशात पहिले 50 हजार रुग्ण होण्यास 97 दिवस लागले होते. आता दर 3 दिवसांत 50 हजार रुग्णांची वाढ होत आहे. मागील 12 दिवसांतच 2 लाख कोरोनाग्रस्तांची वाढ झाली. अशाच वेगाने रुग्ण वाढल्यास जुलै अखेरपर्यंत संक्रमितांची संख्या 15 लाख पार जाऊ शकते.  

देशात आतापर्यंत 3.21 लाख रुग्णांची कोरोनावर मात

महाराष्ट्रात लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आले आहे. याआधी पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये लॉकडाउन 31 जुलैपर्यंत आणि मणिपूरमध्ये 15 जुलैपर्यंत वाढवण्यात आले होते. दुसरीकडे देशात आतापर्यंत 5 लाख 50 हजार 395 कोरोना रुग्ण आढळले आहेत. यातील अर्ध्याहून जास्त 3.21 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले, 2.10 लाख जणांवर उपचार सुरू आहेत. देशभरात कोरोनामुळे आतापर्यंत 16 हजार 492 जणांचा मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना तीन दिवसांपासून ताप होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची फोनवर विचारपूस केली आहे. शनिवारी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.

शनिवारी विक्रमी 14229 लोक बरे झाले. आतापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी विक्रमी 20 हजार 132 नवे रुग्ण आढळले. एका दिवसात हे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी मागील दोन दिवस सलग 18 हजाराहून अधिक रुग्ण आढळले होते. यासोबतच दिल्लीत 80 हजार कोरोना रुग्ण झाले आहे. यामुळे राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या लिस्टमध्ये दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.

प्रति दहा लाख लोकसंख्येत दिल्लीत सर्वाधिक मृत्यू

देशात आतापर्यंत 16103 मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू 7273 झाले. परंतु लोकसंख्येच्या बाबतीत, जास्त जीव दिल्लीत गेले. राजधानीत येथे दर दहा लाख लोकसंख्येमध्ये 129 लोकांचा मृत्यू होत आहे. हा मृत्यूदर देशातील सर्वात जास्त आहे. 

राज्यएकूण लोकसंख्याएकूण मृत्यूरुग्णांचे मृत्यू (प्रति लाख)
दिल्ली1.98 कोटी2558129
महाराष्ट्र12.21 कोटी727359
गुजरात6.79 कोटी179026
तमिलनाडु7.56 कोटी102613
हरियाणा2.86 कोटी2187
बातम्या आणखी आहेत...