आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:एका दिवसात आढळले 45,975 नवे रुग्ण, आठवडाभर रुग्णांचा आकडा 40 हजारांपार, गेल्या 9 दिवसात 70 हजार सक्रिय रुग्णांमध्ये वाढ

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजघडीला देशात 3.82 लाख लोक उपचार घेत आहेत.

देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजे बुधवारी 45 हजार 975 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 35 हजार 91 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यात 507 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासोबतच कोरोनाच्या सक्रिय रुग्णांतही वाढ होत आहे. देशात बुधवारी सक्रिय 10 हजार 365 ने वाढ झाली.

विशेष म्हणजे गेल्या 8 दिवसात सलग 7 वेळा कोरोनाचे रुग्ण 40 हजारांपार गेले आहेत. तर दुसरीकडे, उपचार घेणाऱ्यांच्या आकडेवारीत गेल्या 9 दिवसात 70 ने वाढ झाली आहे. यापूर्वी 23 ऑगस्ट रोजी 3.13 लाख लोक उपचार घेत होते. आजघडीला देशात 3.82 लाख लोक उपचार घेत आहेत.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 45,975
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 35,091
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 507
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.28 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले : 3.20 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.39 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 3.82 लाख
बातम्या आणखी आहेत...