आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:एका दिवसात आढळले 43,374 प्रकरणे, 527 लोकांचा मृत्यू; हिमाचलमध्ये 100% तरुणांना कोरोना लसीचा एक डोस

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आजघडीला 3.70 लाख लोकांवर उपचार सुरु आहे.

देशातील कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. रविवारी देशात 43 हजार 374 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 34 हजार 843 लोक उपचार घेत बरे झाले, तर यामध्ये 527 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासोबतच सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत 7 हजार 993 ने वाढ झाली. देशात आजघडीला 3.70 लाख लोकांवर उपचार सुरु आहे.

केरळ राज्यात चिंताजनक परिस्थिती बनत चालली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 29 हजार 836 कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर दुसरीकडे, 100 टक्के तरुणांना कोरोना लसीचे एक डोस देणारे हिमाचल प्रदेश पहिले राज्य बनले आहे. हिमाचल प्रदेश सरकारने 18 वर्षांवरील सर्वच लोकांना एक डोस दिले आहे. विशेष म्हणजे देशात गेल्या 7 दिवसापासून पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वाढ होत आहे. 23 ऑगस्ट रोजी देशातील पॉझिटिव्हीटी 1.3% होते, यामध्ये वाढ होत आह हा आकडा 2.9% आला आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे...

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण संख्या : 43,374
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 34,843
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 527
  • आतापर्यंत संक्रमित झालेले एकूण रुग्ण : 3.27 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.19 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.38 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 3.70 लाख
बातम्या आणखी आहेत...