आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:गेल्या 24 आढळले 39,522 नवीन प्रकरणे, 43,906 बरे झाले; 13 दिवसांनंतर बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू महाविद्यालयात लसीकरणासाठी मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. - Divya Marathi
प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू महाविद्यालयात लसीकरणासाठी मोठ्या संख्येने गर्दी जमली होती.
  • देशात आतापर्यंत 3.21 कोटी लोक बरे झाले आहेत.

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणात चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत म्हणजे रविवारी 39 हजार 522 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 43 हजार 906 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 218 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दिलासादायक बातमी म्हणजे 13 दिवसांनंतर उपचार घेत बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत 3.21 कोटी लोक बरे झाले आहेत. विशेष म्हणजे सलग 5 दिवसांनंतर सक्रिय रुग्णांत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. रविवारी देशात सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत 4 हजार 611 ने घट झाली आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 39,522 मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 43,906 मागील 24 तासात एकूण मृत्यू : 218 आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.30 कोटी आतापर्यंत एकूण बरे झालेले : 3.21 कोटी आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.40 लाख सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 3.99 लाख

बातम्या आणखी आहेत...