आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE 29 August News And Live Updates

कोरोना देशात:गेल्या 24 तासात आढळले 45,064 नवीन प्रकरणे, 457 मृत्यू, 6 दिवसांत सक्रिय रुग्णात 13 हजाराने वाढ

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केरळमध्ये गेल्या 4 दिवसापासून 30 हजारांवर रुग्ण आढळले आहे.

देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. शनिवारी सलग चौथ्या दिवशी कोरोना प्रकरणाने 40 हजारांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत देशात 45 हजार 64 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 35 हजार 811 लोक उपचार घेत बरे झाले तर 457 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर दुसरीकडे, कोरोनाच्या सक्रिय रुग्णांतदेखील वाढ झाली आहे. शनिवारी राज्यात सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत 13 हजार 217 ने वाढ झाली. देशात 23 ऑगस्ट रोजी 3.13 लाख लोकांवर उपचार सुरु होता. 28 ऑगस्ट रोजी ही संख्या वाढून 3.62 वर पोहोचली. केरळ राज्यात नवीन प्रकरणात वाढ झाल्याने देशातील सक्रिय रुग्णात वाढ झाली आहे. केरळमध्ये गेल्या 4 दिवसापासून 30 हजारांवर रुग्ण आढळले आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे...

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण संख्या : 45,064
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 35,811
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 457
  • आतापर्यंत संक्रमित झालेले एकूण रुग्ण : 3.26 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.18 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.37 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 3.62 लाख
बातम्या आणखी आहेत...