आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात कोरोनाने 3 लाख मृत्यू:रविवारी 2.22 लाख नवीन संक्रमितांची नोंद, तर 3.02 लाखांची कोरोनावर मात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवीन संक्रमितांचा आकडा मागील 38 दिवसातील सर्वात कमी

देशातील कोरोनाची दुसरी लाट हळुहळू कमी होताना दिसत आहे. देशात रविवारी 2 लाख 22 हजार 704 नवीन संक्रमित आढळले. हा आकडा मागील 38 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी 15 एप्रिलला 2.16 संक्रमितांची नोंद झाली आहे. तर, रविवारी 4,452 संक्रमितांचा मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे, 3 लाख 2 हजार 83 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू होण्याचा आकडा 3 लाखांच्या पुढे गेला आहे. मागच्या वर्षी 13 मार्चला पहिल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. यानंतर 14 महीन्यातच 3 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 3 लाख 3 हजार 751 रुग्णांचा या महामारीने जीव घेतला आहे.

मृत्यूचा आकडा वाढतच आहे
देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे, पण मृतांचा आकडा थांबायचे नाव घेत नाहीये. मे महिन्यात दररोज सरासरी 3,500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा जगात सर्वाधिक आहे. जगात फक्त दोन देशात कोरोनामुळे तीन लाकांपेक्षा जास्त मृत्यू झाले होते. अमेरिका पहिला आणि ब्राझील दुसरा. अमेरिकेत 6 लाख आणि ब्राझीलमध्ये 4.48 लाख मृत्यू झाले आहेत. या यादीत आता तिसऱ्या नंबरवर भारताचे नाव आहे.

एक लाख मृत्यू फक्त एका महिन्यात झाले

देशात कोरोनामुळे पहिले एक लाख मृत्यू होण्यासाठी सहा महिने लागले होते. एक लाखांवरुन दोन लाख होण्यास 7 महीने लागले. पण, 2 ते 3 लाख होण्यास फक्त एक महिना लागला.

बातम्या आणखी आहेत...