आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Corona (COVID 19) Death Toll India Today 19th May

कोरोना देशात:मंगळवारी देशभरात सर्वाधिक 4,525 मृत्यू; 2.67 लाख नवीन संक्रमित आढळले, तर 3.89 लाख ठीक झाले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी देशभरात सर्वाधिक 4,525 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापूर्वी, सोमवारी 4,334 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, देशात नवीन संक्रमितांचे आकडे दिलासा देणार आहे. मंगळवारी देशभरात 2 लाख 67 हजार 44 नवीन रुग्ण आढळले, तर 3 लाख 89 हजार 566 रुग्ण ठीक झाले. यामुळे सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत एक लाख 27 हजार 109 ने घट झाली आहे.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • मागील 24 तासात रुग्ण आढळले: 2.67 लाख
  • मागील 24 तासात ठीक झाले: 3.89 लाख
  • मागील 24 तासात मृत्यू झाले: 4,525
  • आतापर्यंत संक्रमित झालेले रुग्ण: 2.54 कोटी
  • आतापर्यंत ठीक झालेले रुग्ण: 2.19 कोटी
  • आतापर्यंत झालेले मृत्यू: 2.83 लाख
  • उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या: 32.21 लाख
बातम्या आणखी आहेत...