आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Death Toll India Today 16may

कोरोना देशात:शनिवारी 3.10 लाख नवीन रुग्णांची नोंद, हा मागील 25 दिवसांतील सर्वात कमी आकडा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी 4,075 रुग्णांचा मृत्यू, तर 3.62 लाख रुग्णांची कोरोनावर मात

देशातील कोरोनाची दुसरी लाट हळु-हळू कमी होताना दिसत आहे. मागील 24 तासात देशभरात 3 लाख 10 हजार 580 नवीन संक्रमितांची नोंद झाली. हा आकडा मागील 25 दिवसांतील सर्वात कमी आहे. यापूर्वी, 20 एप्रिलला दोन लाख 94 हजार 378 नवीन संक्रमित आढळले होते.

दरम्यान, मृत्यूच्या आकड्याने चिंता कायम ठेवली आहे. शनिवारी देशभरात कोरोनाने 4,075 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा चार हजारांच्या पुढे जाण्याची ही मे महिन्यातील चौथी वेळ आहे. दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनातून ठीक होणाऱ्यांचा आकडाही वाढत आहे. शनिवारी देशभरातील 3 लाख 62 हजार 367 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • शनिवारी आढळलेली रुग्णसंख्या: 3.10 लाख
  • मृत्यू: 4,075
  • ठीक झालले रुग्ण: 3.62 लाख
  • एकूण संक्रमित: 2.46 कोटी
  • आतापर्यंत ठीक झाले: 2.07 कोटी
  • एकूण मृत्यू: 2.70 लाख
बातम्या आणखी आहेत...