आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Maharashtra , Madhya Pradesh, Rajasthan, Uttar Pradesh, Haryana, Punjab, Bihar; Novel Corona (COVID 19) Death Toll India Today, 22nd June 2021

रुग्णांमध्ये मोठी घट:3 महीन्यानंतर नवीन संक्रमितांचा आकडा 50 हजारांच्या खाली, तर 81 हजार 410 रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलासादायक बाब: सोमवारी 1,162 रुग्णांचा मृत्यू, आज एकूण संक्रमितांचा आकडा 3 कोटींच्या पुढे जाणार

कोरोनाबाबत मोठा दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात सोमवारी 42,219 रुग्णांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली. (यात झारखंड, अरुणाचल प्रदेश आणि लडाखची आकडेवारी सामील नाही.) तर, 81 हजार 410 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तसेच 1 हजार 162 रुग्णांचा मृत्यूही झाला.

दिलासादायक बाब म्हणजे 3 महीन्यानंतर नवीन संक्रमितांचा आकडा 50 हजारांच्या खाली आला आहे. यापूर्वी, 23 मार्चला 47,239 संक्रमित आढळले होते. या आकडेवारीसह अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये 40 हजारांची घट झाली आहे. सध्या देशात 6.56 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज तीन कोटींचा आकडा पार होणार
देशात आतापर्यंत 2.99 कोटी नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या संक्रमितांची आकडेवारी पाहिल्यास, आज एकूण संक्रमितांचा आकडा 3 कोटींच्या पुढे जाईल. सध्या भारत जगातील दुसरा सर्वाधिक संक्रमित देश बनला आहे. अमेरिका 3.44 कोटी रुग्णांसह टॉपवर आहे.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • सोमवारी नवीन संक्रमित आढळले: 42,219
  • ठीक झालेले रुग्ण: 81,410
  • मृत्यू: 1162
  • एकूण संक्रमित: 2.99 कोटी
  • आतापर्यंत ठीक झाले: 2.89 कोटी
  • आतापर्यंतचे एकूण मृत्यू: 3.89 लाख
  • सध्या उपचार सुरू: 6.59 लाख

लॉकडाऊन हटवणारे तेलंगाणा पहिले राज्य
तेलंगाणा सरकारने राज्यात 20 जूनपासून लॉकडाउन हटवला आहहे. कोरोना काळात संपूर्ण लॉकडाऊन हटवणारे तेलंगाणा पहिलेच राज्य आहे. राज्यात 1 जुलैपासून शाळाही सुरू होणार आहेत.

प्रमुख राज्यांची परिस्थिती
1. महाराष्ट्र

येथे सोमवारी 6,270 संक्रमित आढळले तर 13,758 रुग्णांनी कोरोनावर मात केली. 352 रुग्णांचा मृत्यूही झाला. सध्या 1.24 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

2. उत्तर प्रदेश
सोमवारी 118 संक्रमित आढळले तर 478 ठीक झाले. 46 रुग्णांचा मृत्यूही झाला. सध्या राज्यात 4,163 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

3. गुजरात
राज्यात सोमवारी 151 संक्रमित आढळले, 619 ठीक झाले. दरम्यान, 2 रुग्णांचा मृत्यूही झाला. सध्या 5,639 रुग्णांवर उपचार सुरू.

4. दिल्ली
दिल्लीत सोमवारी 89 संक्रमित आढळले, 173 ठीक झाले. दरम्यान 11 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 1,996 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...