आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Maharashtra, Madhya Pradesh, Rajasthan, Uttar Pradesh, Haryana, Punjab, Bihar, Novel Corona (COVID 19) Death Toll India Today,17th 2021

कोरोना देशात:बुधवारी 67,256 संक्रमित आढळले तर 1.03 लाख रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील 15 दिवसात यात 10 लाख 30 हजार 587 ची घट झाली

देशातील कोरोना महामारी नियंत्रणात येत आहे. बुधवारी देशभरात 67,256 रुग्णांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली, तर 1 लाख 03 हजार 757 संक्रमित ठीक झाले. दरम्यान, 2,329 रुग्णांचा मृत्यूही झाला. या आकडेवारीनुसार, अॅक्टिव्ह केसेसमध्ये 38,950 ची घट झाली आहे. मागील 15 दिवसात यात 10 लाख 30 हजार 587 ची घट झाली आहे. 1 जूनला देशात 18 लाख 90 हजार 949 संक्रमित होते. आता हा आकडा आंकड़ा 8 लाख 21 हजार 392 झाला आहे.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • बुधवारी आढळलेले रुग्ण: 67,256
  • यादरम्यान ठीक झाले: 1.03 लाख
  • मृत्यू: 2,329
  • एकूण संक्रमित: 2.96 कोटी
  • आतापर्यंत ठीक झाले: 2.84 कोटी
  • एकूण मृत्यू: 3.81 लाख
  • सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या: 8.21 लाख

प्रमुख राज्यांची परिस्थिती
1. महाराष्ट्र

बुधवारी 10,107 संक्रमित आढळले, 10,567 ठीक झाले. दरम्यान, 1,236 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 1.36 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

2. गुजरात
राज्यात बुधवारी 298 संक्रमित आढळले, तर 935 रुग्ण ठीक झाले. 5 रुग्णांचा मृत्यूही झाला. सध्या 8,242 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

3. राजस्थान
बुधवारी 280 संक्रमित आढळले, 928 ठीक झाले. तर, 9 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 4,962 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

5. उत्तर प्रदेश
बुधवारी 251 संक्रमित आढळले, 927 ठीक झाले. 49 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. सध्या 6,496 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

6. दिल्ली
दिल्लीत बुधवारी 212 कोरोना पॉझिटिव्ह आढळले, 516 ठीक झाले. दरम्यान, 25 रुग्णांचा मृत्यूही झाला. सध्या 2,749 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...