आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Maharashtra, Madhya Pradesh, Uttar Pradesh, Haryana, Punjab, Bihar, Novel Corona (COVID 19) Death Toll India Today 23 June 2021

नवी दिल्ली:मंगळवारी 50,784 नवीन संक्रमितांची नोंद तर 68,529 रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळवारी 1359 मृत्यू, 9 राज्यात आताही दररोज एक हजारांपेक्षा जास्त रुग्णसंख्या

देशात मंगळवारी 50 हजार 784 नवीन संक्रमितांची नोंद झाली आहे तर 68 हजार 529 रुग्णांनी कोरोनावर मात केली. यादरम्यान 1,359 रुग्णांचा मृत्यू झाला. अॅक्टिव्ह केसेसमध्ये 19,122 घट झाली आहे. या आकडेवारीसह देशातील एकूण संक्रमितांचा आकडा 3 कोटींच्या पुढे गेला आहे.

चिंताजनक बाब म्हणजे 9 राज्यात आताही दररोज एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. यात महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिसा, तेलंगाणा आणि असामचा समावेश आहे.

देशाती कोरोनाची आकडेवारी

  • मागील 24 तासात नवीन रुग्ण आढळले: 50,784
  • ठीक झाले: 68,529
  • मृत्यू: 1359
  • एकूण संक्रमित: 3 कोटी
  • आतापर्यंत ठीक झाले: 2.89 कोटी
  • एकूण मृत्यू: 3.90 लाख
  • सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या: 6.38 लाख

प्रमुख राज्यातील परिस्थिती
1. महाराष्ट्र
मंगळवारी 8,470 संक्रमित आढळले तर 9,043 ठीक झाले. यादरम्यान, 482 मृत्यू झाले. सध्या 1.23 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

2. उत्तर प्रदेश
मंगळवारी 202 संक्रमित आढळले तर 397 ठीक झाले. 58 रुग्णांचा मृत्यूही झाला. सध्या 3,910 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

3. गुजरात
राज्यात मंगळवारी 135 संक्रमित आढळले तर 612 ठीक झाले. यादरम्यान, 3 मृत्यू झाला. सध्या 5,159 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

4. दिल्ली
दिल्लीत मंगळवारी 397 रुग्णांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली तर 467 ठीक झाले. 8 मृत्यूही झाले. सध्या 1,918 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...