आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Maharashtra ,Madhya Pradesh,Rajasthan, Uttar Pradesh, Haryana, Punjab, Bihar, Novel Corona (COVID 19) Death Toll India Today 15th June

दिलासादायक:नवीन संक्रमितांच्या संख्येत मोठी घट, सोमवारी देशभरात आढळले 59,958 रुग्ण तर 1.17 लाख रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवीन संक्रमितांचा आकडा मागील 76 दिवसातील सर्वात कमी

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. सोमवारी देशभरात 59,958 नवीन संक्रमित आढळले. हा आकडा मागील 76 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी, 30 एप्रिलला 53,237 संक्रमित आढळले होते. नवीन संक्रमितांसह मृतांच्या आकड्यातही थोडी घट झालेली पाहायला मिळत आहे. मागील 24 तासात 2,732 रुग्णांचा मृत्यू झालाय. दिलासादायक बाब म्हणजे, सोमवारी 1 लाख 17 हजार 232 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • मागील 24 तासात नवीन रुग्ण आढळले: 59,958
  • मागील 24 तासात ठीक झालेले रुग्ण: 1.17 लाख
  • मागील 24 तासातील मृत्यू: 2,732
  • एकूण संक्रमित: 2.82 कोटी
  • आतापर्यंत ठीक झाले: 2.82 कोटी
  • एकूण मृत्यू: 3.77 लाख
  • सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या: 9.08 लाख

प्रमुख राज्यातील परिस्थिती

1. महाराष्ट्र
सोमवारी 8,129 नवीन संक्रमित आढळले तर 14,732 ठीक झाले. यादरम्यान, 1,592 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 1.47 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

2. छत्तीसगड
राज्यात सोमवारी 600 संक्रमित आढळले, तर 1,600 ठीक झाले. यादरम्यान, 17 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 12,660 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

3. गुजरात
सोमवारी 405 रुग्ण आढळले, तर 1,106 ठीक झाले. सध्या 9,542 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

4. उत्तर प्रदेश
येथे सोमवारी 313 लोकांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली तर 1,116 ठीक झाले. सध्या राज्यात 8,111 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

5. राजस्थान
सोमवारी 277 रुग्ण आढळले, तर 1,231 ठीक झाले आणि 20 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 6,467 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

6. मध्यप्रदेश
सोमवारी 242 रुग्ण आढळले, तर 516 जणांनी कोरोनावर मात केली. तसेच, 36 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात 3,941 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

7. दिल्ली
दिल्लीी सोमवारी 131 रुग्ण आढळले, तर 355 ठीक झाले. सध्या येथे 3,226 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...