आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Maharashtra Pune Madhya Pradesh Bhopal Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today 20th June 2021

कोरोना देशात:मागील 24 तासात 58,562 नवीन संक्रमितांची नोंद तर 87,493 रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी 1,537 रुग्णांचा मृत्यू, नवीन संक्रमितांचा आकडा 81 दिवसातील सर्वात कमी

देशात शनिवारी 58,562 नवीन संक्रमितांची नोंद झाली आहे तर 87,493 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यादरम्यान 1,537 रुग्णांचा मृत्यूही झाला. सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत 30,518 ची घट झाली आहे. विशेष म्हणजे, शनिवारी आढळलेली रुग्णसंख्या मागील 81 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी, 30 मार्चला 53,237 संक्रमित आढळले होते.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • मागील 24 तासात आढळलेले संक्रमित: 58,562
  • शनिवरी ठीक झालेले रुग्ण: 87,493
  • मृत्यू: 1537
  • आतापर्यंतचे एकूण संक्रमित: 2.98 कोटी
  • आतापर्यंत ठीक झाले: 2.87 कोटी
  • एकूण मृत्यू: 3.86 लाख
  • सध्या उपचार सुरू : 7.24 लाख

प्रमुख राज्यातील परिस्थिती

महाराष्ट्र
शनिवारी 8,912 संक्रमित आढळले तर 10,373 ठीक झाले. यादरम्यान, 682 रुग्णांचा मृत्यूही झाला. सध्या 1.32 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेश
शनिवारी 257 संक्रमित आढळले तर 592 रुग्ण ठीक झाले. यादरम्यान, 51 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 4,957 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

गुजरात
राज्यात शनिवारी 228 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर 874 ठीक झाले. शनिवारी 5 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या 6,579 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिल्ली
दिल्लीत शनिवारी 135 संक्रमित आढळले तर 201 ठीक झाले. सध्या 2,372 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...