आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Novel Corona (COVID 19) Death Toll India Today 13th May

कोरोना देशात:नवीन संक्रमितांमध्ये पुन्हा वाढ, बुधवारी आढळले 3.62 लाख रुग्ण; सलग दुसऱ्या दिवसी 4 हजारांपेक्षा जास्त मृत्यू

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी 3.51 लाख रुग्णांची कोरोनावर मात

देशात कोरोना रुग्णांमध्ये मागील 24 तासात पुन्हा वाढ झाली. बुधवारी 3 लाख 62 हजार 389 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 51 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, बुधवारी 4,127 रुग्णांचा मृत्यू झाला. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे.

देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत. यातील, 1.97 कोटी रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील काही दिवसांपासून सरासरी 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण रिकव्हर होत आहेत.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • मागील 24 तासात आढळलेले नवीन संक्रमित: 3.62 लाख
  • मागील 24 तासात झालेले मृत्यू: 4,127
  • मागील 24 तासात ठीक झालेले रुग्ण: 3.51 लाख
  • आतापर्यंत संक्रमित झाले: 2.37 कोटी
  • आतापर्यंतठीक झाले: 1.97 कोटी
  • आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू: 2.57 लाख
  • सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या: 37.22 लाख
बातम्या आणखी आहेत...