आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Novel Corona (COVID 19) Death Toll India Today 14th May; News And Live Updates

कोरोना देशात:नवीन संक्रमितांमध्ये पुन्हा वाढ, गेल्या 24 तासांत आढळले 3.62 लाख रुग्ण, 3.51 लाख रुग्ण बरे; सलग दुसऱ्या दिवशी 4 हजारांपेक्षा जास्त मृत्यू

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • UPSC ने 27 जूनला होणारी पुर्व परीक्षा पुढे ढककली

देशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या 24 तासांत देशातील नवीन रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. गुरुवारी 3 लाख 62 हजार 632 नवीन रुग्ण सापडले, तर 3 लाख 52 हजार 5 रुग्णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, गुरुवारी 4 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे.

देशात या महामारीच्या विळख्यात आतापर्यंत 2.37 कोटी लोक आले आहेत. यातील, 1.97 कोटी रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील काही दिवसांपासून सरासरी 3 लाखांपेक्षा जास्त रुग्ण बरे होत आहेत. देशात कोरोना रुग्णांसोबत बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत असून सध्या 37.06 लाख लोकांवर उपचार सुरु आहेत.

मागील 24 तासात आढळलेले नवीन संक्रमित: 3.62 लाख

 • मागील 24 तासात झालेले मृत्यू: 4,128
 • मागील 24 तासात ठीक झालेले रुग्ण: 3.52 लाख
 • आतापर्यंत संक्रमित झाले: 2.37 कोटी
 • आतापर्यंतठीक झाले: 1.97 कोटी
 • आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू: 2.57 लाख
 • सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या: 37.22 लाख

UPSC ने 27 जूनला होणारी पुर्व परीक्षा पुढे ढककली
देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. दरम्यान कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC)ने देखील 27 जून रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. आता या परीक्षा 10 ऑक्टोबरला घेतल्या जातील.

देशभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे, यासोबतच मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. यामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे अनेक परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या. आता यासोबतच UPSC नेही महत्त्वाचा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. UPSC 2021 ची प्रिलिमनिरी परीक्षा आता 10 ऑक्टोबर घेतली जाईल.

10 ऑक्टोबरला होणार परीक्षा
आयोगाने जारी नोटिफिकेशनमध्ये सांगितले की, 'कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सध्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2021 स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा 27 जूनला घेतल्या जाणार होत्या, मात्र आता ही परीक्षा 10 ऑक्टोबर 2021 ला आयोजित केली जाईल.'

बातम्या आणखी आहेत...