आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Novel Corona (COVID 19) Death Toll India Today, 1st June

दिलासादायक बाब:सोमवारी 2.54 लाख रुग्णांची कोरोनावर मात, 22 दिवसांत ॲक्टीव्ह रुग्ण 18 लाखांनी घटले

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील 24 तासात 1.26 लाख नवीन संक्रमितांची नोंद

देशातील कोरोना संसर्गाची गती हळुहळू कमी होत आहे. सोमवारी देशभरात 1 लाख 26 हजार 649 नवीन संक्रमित आढळले, तर 2 लाख 54 हजार 879 रुग्णांनी कोरोनावर मात केली. नवीन संक्रमितांचा आकडा मागील 55 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी 7 एप्रिलला 1 लाख 26 हजार 276 संक्रमित आढळले होते.

दरम्यान, नवीन संक्रमितांसह मृतांच्या आकड्यातही घट झालेली पाहायला मिळत आहे. 35 दिवसानंतर मृतांचा आकडा 3000 च्या खाली उतरला. सोमवारी 2,781 रुग्णांचा मृत्यू झाला. यापूर्वी, 26 एप्रिलला 2,762 रुग्णांनी जीव गमावला होता.

दिलासादायक बाब म्हणजे, अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत एका दिवसात 1 लाख 31 हजार 31 ची घट झाली आहे. आता देशात 18 लाख 90 हजार 975 संक्रमितांवर उपचार सुरू आहेत. मागील 22 दिवसांत यात 18 लाख 50 हजार 327 घट झालेली पाहायला मिळत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये 9 मे रोजी आपण 37 लाख 41 हजार 302 रुग्णांसह पीकवर होतो.

बातम्या आणखी आहेत...