आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update, Novel Corona (COVID 19) Death Toll India Today 21may

कोरोना देशात:गुरुवारी 2.59 लाख नवीन संक्रमितांची नोंद, तर 3.57 लाख ठीक झाले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवीन रुग्णांचा आकडा 34 दिवसांत सर्वात कमी

देशात कोरोना संक्रमितांचा ग्राफ कमी होताना दिसत आहे. मागील 24 तासात देशभरात 2.59 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 3.57 लाख रुग्ण ठीक झाले आहेत. परंतु, महामारीमुळे जीव जाणाऱ्यांचा आकडा पुन्हा एकदा 4 हजारांच्या पुढे गेला आहे. गुरुवारी देशभरात 4,208 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

गुरुवारी कोरोना रुग्णांचा आकडा मागील 34 दिवसांतील सर्वात कमी होता. यापूर्वी, 16 एप्रिलला 2.34 लाख नवीन रुग्ण आढळले होते. दरम्यान, दिलासादायक म्हणजे, 8 दिवसांपासून ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. यामुळे अॅक्टीव्ह केसेसची संख्या कमी होत आहे.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • गुरुवारी नवीन रुग्ण आढळले: 2.56 लाख
  • गुरुवारी ठीक झाले: 3.52 लाख
  • गुरुवारी झालेले मृत्यू: 4,146
  • एकूण संक्रमित: 2.60 कोटी
  • आतापर्यंत ठीक झाले: 2.27 कोटी
  • एकूण मृत्यू: 2.91 लाख
  • अॅक्टीव्ह रुग्ण: 30.24 लाख
बातम्या आणखी आहेत...