आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Novel Corona (COVID 19) Death Toll India Today, 8th June

दिलासादायक आकडेवारी:63 दिवसानंतर नवीन संक्रमितांचा आकडा एक लाखाच्या खाली, सोमवारी 1.85 लाख रुग्णांची कोरोनावर मात

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागील 24 तासात देशात 87,295 नवीन संक्रमितांची नोंद, तर 2,115 रुग्णांचा मृत्यू

देशातील कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. देशातील सोमवारची आकडेवारी दिलासा देणारी आहे. सोमवारी देशभरात 87,295 नवीन संक्रमितांची नोंद झाली आहे. हा आकडा मागील 63 दिवसानंतर देशात एक लाखांपेक्षा कमी संक्रमित आढळले. यापूर्वी, 5 एप्रिलला 96,563 संक्रमित आढळले होते. नवीन संक्रमितांसह मृतांच्या आकड्यातही घट होत आहे. मागील 24 तासात देशभरात 2,115 रुग्णांचा मृत्यू झालाय. हा आकडा मागील 46 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी, 22 एप्रिलला 2,257 रुग्णांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, कालच्या आकडेवारीसोबत देशातील एकूण मृतांचा आकडा 3 लाख 51 हजार 344 वर पोहचला आहे.

दरम्यान, एक चांगली बाब म्हणजे, सोमवारी देशात 1 लाख 85 हजार 747 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासह देशात सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1 लाख 535 घट झाली आहे.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • मागील 24 तासात आढळलेली रुग्णसंख्या: 87,955
  • मागील 24 तासात ठीक झाले: 1.85 लाख
  • सोमवारी झालेले मृत्यू: 2,115
  • आतापर्यंतचे एकूण संक्रमित: 2.89 कोटी
  • आतापर्यंत ठीक झाले: 2.73 कोटी
  • एकूण मृत्यू: 3.51 लाख
  • सध्या उपचार सुरू असलेली रुग्णसंख्या: 12.97 लाख
बातम्या आणखी आहेत...