आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:महाराष्ट्रात दोन दिवसांच्या आत रुग्ण वाढण्याचा वेग 5 पटींनी वाढला; 24 तासात येथे 4 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण वाढले

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात आतापर्यंत 1.09 कोटी लोक संक्रमित झाले आहेत.

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण समोर येण्याचा वेग आचानक वाढला आहे. दोन दिवसांच्या आत 5 पट जास्त वेगाने रुग्ण वाढत आहेत. 11 फेब्रुवारीला राज्यात 652 लोक कोरोना संक्रमित आढळले होते. 13 फेब्रुवारीला हा आकडा वाढून 3670 आणि 14 फेब्रुवारीला 4092 पर्यंत पोहोचला. रविवारी 40 मृत्यूंची नोंद झाली.

महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढल्याचा परिणाम देशाच्या आकड्यांवरही झाला आहे. देशात रविवारी 11,431 नवीन रुग्ण आढळले, 9,267 बरे झाले. हा सलग तिसरा दिवस होता, जेव्हा बरे होणाऱ्या नवीन संक्रमितांचा आकडा जास्त राहिला. गेल्या 24 तासांमध्ये 87 संक्रमितांनी जीव गमावला. तर अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 2,073 ने वाढ झाली आहे. 26 नोव्हेंबरनंतर अॅक्टिव्ह केसमध्ये ही सर्वात मोठी वाढ आहे. तेव्हा 2927 अॅक्टिव्ह केस वाढल्या होत्या.

देशात आतापर्यंत 1.09 कोटी लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 1.06 कोटी लोक बरे झाले आहेत. तर 1.55 लाख रुग्णांनी जीव गमावला आहे. तर 1.36 लाख जणांवर सुरू आहेत उपचार.

बातम्या आणखी आहेत...