आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:महाराष्ट्रात येतेय कोरोनाची तिसरी लाट; गेल्या एका आठवड्यात नवीन रुग्ण वाढण्याचा वेग 200% नी वाढला

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारत जगातील 5 वा देश आहे, जेथे आतापर्यंत सर्वात जास्त लोकांना लस देण्यात आली आहे.

महाराष्ट्राने देशातील अडचणी पुन्हा वाढवल्या आहेत. गेल्या एक आठवड्यांपासून येथे नवीन रुग्ण आढळण्याचा वेग 200% ने वाढला आहे. याच कारणामुळे गेल्या 7 दिवसांपासून सातत्याने अॅक्टिव्ह केसच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी राज्यात विक्रमी 5,427 नवीन रुग्ण आढळले. 4 डिसेंबरनंतर हे पहिल्यांदा आहे जेव्हा राज्यात 5 हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण एका दिवसात मिळाले आहेत. राज्यात आतापर्यंत 20 लाख 81 हजार 520 लोक संक्रमित झाले आहेत. यामध्ये 19 लाख 87 हजार 804 लोक बरे झाले आहेत. तर 51 हजार 669 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 40 हजार 858 रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये 12 हजारांपेक्षा जास्त प्रकरणे
देशात गुरुवारी एकूण 12,826 नवीन रुग्ण आढळले. 10,489 बरे झाले आणि 86 संक्रमितांनी जीव गमावला. आतापर्यंत कोरोनाचे 1.09 कोटी केस समोर आल्या आहेत. यामधून 1.06 कोटी रुग्ण बरे झाले आहेत. 1.56 लाख जणांनी जीव गमावला आहे. तर 1.36 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.

आज एक कोटी लोकांपर्यंत पोहोचणार व्हॅक्सीन
देशात लस घेणाऱ्या लोकांचा आकडा आज 1 कोटींच्या पार होईल. आतापर्यंत 98 लाखांपेक्षा जास्त हेल्थ केअर आणि फ्रंट लाइन वर्कर्सला व्हॅक्सीन देण्यात आली आहे. एवढ्या लोकांना लस देण्यासाठी 34 दिवस लागले. आतापर्यंत 62 लाखांपेक्षा जास्त हेल्थ केअर वर्कर्स आणि 31 लाखांपेक्षा जास्त फ्रंट लाइन वर्कर्सचे व्हॅक्सीनेशन झाले आहे. 4.64 लाख हेल्थ केअर वर्कर्सला व्हॅक्सीनचा दुसरा डोजही मिळाला आहे.

5 वा देश जेथे सर्वात जास्त लसीकरण
भारत जगातील 5 वा देश आहे, जेथे आतापर्यंत सर्वात जास्त लोकांना लस देण्यात आली आहे. अमेरिकेत 5 कोटी, चीनमध्ये 4 कोटी यूरोपियन यूनियनमध्ये 2 कोटी लोकांना व्हॅक्सीन देण्यात आली आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत 18 कोटी 84 लाखांपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली आहे. 97 देश आणि उपमहाद्वीपमध्ये व्हॅक्सीनेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...